Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगाव शहरात सायकल फेरी काढून मतदान जागृती अभियान

शेवगाव तालुका ः शेवगाव सायकल असोसिएशन व तहसील, पंचायत समिती व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय या ठिकाणाहून सायकल फेरी चे आय

कट मारल्याच्या कारणावरून एकाच्या खुनाचा प्रयत्न
राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी  गौतम पब्लिक स्कूलचा संघ रवाना
केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना नथुराम-डायर मंत्री घोषित करणार

शेवगाव तालुका ः शेवगाव सायकल असोसिएशन व तहसील, पंचायत समिती व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय या ठिकाणाहून सायकल फेरी चे आयोजन करण्यात आले. ही सायकल फेरी तहसील, गाडगे चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेसिडेन्सी हायस्कूल, विद्यानगर, इंदिरानगर त्याचप्रमाणे क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ब्राह्मण गल्ली, भगतसिंग चौक, खालची वेस, बाजारपेठ, पंचायत समिती,वडार गल्ली, स्व.गोपीनाथराव मुंडे चौक ते तहसील अशी काढण्यात आली.
या सायकल फेरीची सुरुवात सकाळी सातला करण्यात आली. नऊ वाजता फेरी संपन्न झाली. शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे व शेवगाव सायकल असोसिएशनचे सचिव कैलास जाधव यांनी मतदारांमध्ये चौका चौकात घोषणा व प्रबोधनपर भाषण करून मतदारांना जागृत करण्याचे कार्य केले. यामध्ये चौका चौकामध्ये मतदारही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. यामुळे मतदानाचा जो टक्का आहे तो निश्‍चित वाढेल अशी आशा आहे. यावेळी बोलताना प्रशांत सांगडे म्हणाले, माझ्या डोक्यात कल्पना आली की सायकल असोशियनला बरोबर घेऊन सायकल फेरीच्या माध्यमाने मतदान जागृती करावी. भारतीय राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे आणि तो हक्क आपण कुठलेही कारण न सांगता तो बजावला पाहिजे. त्यामुळे आपल्याला लोकशाही मजबूत करता येईल.मतदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ते आपण दिनांक 13 सोमवार रोजी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन केले पाहिजे. यावेळी बोलताना शेवगाव सायकल असोसिएशनचे कैलास जाधव म्हणाले की, तहसीलदार यांनी मतदार राजाला जागृत करण्यासाठी आमच्या सायकल क्लबला लोकशाहीचा धागा होण्याचा जी संधी दिली, त्यामुळे राष्ट्रीय सामाजिक उपक्रमात भाग घेण्याची संधी सायकल असोसिएशनला मिळाली आणि त्यामुळे हा जो लोकशाहीचा महोत्सव आहे, त्या महोत्सवामध्ये सायकल असोसिएशन एक धागा म्हणून जोडल्या गेला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तरी शंभर टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज असून त्यासाठी प्रत्येक सुजाण नागरिकांनी मतदान जनजागृती स्वतःहून करणे महत्त्वाचे आहे. या अभिनव  उपक्रमामध्ये शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे, गटविकास अधिकारी राजेश कदम, अप्पर तहसीलदार राहुल गुरव नायब तहसीलदार, रवींद्र सानप नायब तहसीलदार निलेश वाघमारे, स्वीप सहाय्यक श्रीमती शैलाजा राऊल, सायकलचे अध्यक्ष विनोद ठाणगे, सायकल असोसिएशनचे उपाध्यक्ष व समन्वयक डॉ.संदीप बोडखे, शेवगाव सायकल असोसिएशनचे सचिव कैलास जाधव सर, खजिनदार वसंत सुरवसे, डॉक्टर जगदीश कुलकर्णी, डॉक्टर मुकुंद दारकुंडे, डॉक्टर कृष्णा देहाडराय, डॉक्टर संजय  लड्डा,माजी सैनिक  संघटना अध्यक्ष विनोद शेळके मेजर, निळकंठ लबडे सुनील गवळी, निलेश केवळ, प्रदीप बोडके संतोष भागवत,प्रा. गजानन लोंढे, प्रशांत  सुपेकर संजय तरटे,सिध्देश देहाडराय, सचिन मुळे, प्रा. मच्छिंद्र आघाट वल्लभ लोहिया या सायकल असोसिएशनच्या सदस्यांनी या सायकल मतदान जागृती व प्रचार प्रसार फेरी मध्ये उत्साहाने सहभाग घेतला. रमेश गोरे, सचिन भाकरे, कल्याण मुटकुळे,मारूती फरताळे, महसूल सहायक सुरेश बर्डे,दिलीप चव्हाण यांनी उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

COMMENTS