Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा बाजार समिती सचिव दिलीप डेबरे निलंबित

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा कृषी उत्पन्न समितीत झालेल्या कांदा अनुदान घोटाळा राज्यात गाजला याबाबत पोलीस चौकशी सुरू झाली असतानाच बाजार समितीच्या संच

विजेचा शॉक बसून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू 
कोठल्याच्या दगडफेक प्रकरणी खुनाचा प्रयत्न गुन्हा दाखल
शेवगावमध्ये 23 नोव्हेंबरला मनोज जरांगे यांची विराट सभा

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा कृषी उत्पन्न समितीत झालेल्या कांदा अनुदान घोटाळा राज्यात गाजला याबाबत पोलीस चौकशी सुरू झाली असतानाच बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सभेत सचिव दिलीप डेबरे यांच्या निलंबनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. मागील कार्यकाळात सचिव यांच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी पाच संचालकांची समिती नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती सभापती अतुल लोखंडे यांनी पत्रकारांना दिली.
श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समिती मागील काही वर्षांपासून कायमच चर्चेत आहे. त्यात मागील हंगामात सरकारने दिलेल्या उन्हाळी कांदा अनुदानात झालेला कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यात सचिव आणि काही व्यापारी यांचे नाव आले.याबाबतीत जिल्हा लेखापरीक्षक अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल दिला. यावर संबंधितावर गुन्हे दाखल होण्यापूर्वी पोलीस प्रशासनाने हमाल, मापाडी,संबंधित व्यापारी यांची चौकशी पोलीस अधिकारी करत होते त्यात भ्रष्टाचार झाल्याचे नोंदवले आहेत. यातच बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या दिनांक 9 रोजी झालेल्या सभेत सचिव दिलीप डेबरे यांचे निलंबन करण्याचा ठराव सर्व संचालक मंडळाने केला. तसेच पाच संचालकांची चौकशी समिती नेमण्यात आली. सचीव डेबरे मागील काही वर्षापासून सातत्याने गैरहजर राहत आहेत. त्यांच्या कार्यकाळात चुकीचे कामकाज झाले. आर्थिक अपहाराचे आरोप झाले आहेत. बाजार समितीच्या नावलौकिकास सचिव डेबरे यांच्याकामकाजामुळे बाधा आली. अशा वा व्यक्तीला पदावर ठेऊ नये, असे संचालक मंडळाच्या सभेत ठरले. सचिव यांचे निलंबन करून त्याच्या कार्यकाळात झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी पाच संचालकाची समिती नेमण्यात आली आहे. अशी माहिती सभापती अतुल लोखंडे यांनी दिली.

बाजार समितीचे सचिव डेबरे यांच्यावर कारवाई करताना संचालक मंडळाला वेगवेगळ्या अडचणी यायच्या. डेबरे माच्या गैरकारभारविरुद्ध कारवाई व्हावी यासाठी त्यांचे निलंबन गरजेचे होते यावर कारवाई होण्यासाठी सर्व प्रमुख नेत्यांनी सहकार्य केले.
अतुल लोखंडे, लोखंडे

COMMENTS