Homeताज्या बातम्यासंपादकीय

हल्लेखोर दोषी, सूत्रधार निर्दोष !

न्यायाला विलंब म्हणजे अन्याय, अशी एक म्हण मराठीत आहे. त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीच्या संदर्भात न्याय मिळण्यासाठी जर उशीर झाला, तर, ती बाब न्याय मि

पलटीबाज नितिशकुमार ! 
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी फडणवीस प्रयत्नशील!
संयुक्त किसान सभेचे यशस्वी आंदोलन ! 

न्यायाला विलंब म्हणजे अन्याय, अशी एक म्हण मराठीत आहे. त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीच्या संदर्भात न्याय मिळण्यासाठी जर उशीर झाला, तर, ती बाब न्याय मिळाला असला तरी ती अन्याय्य वाटते किंवा राहते, असा या म्हणीचा मतितार्थ आहे. तीच बाब अंधश्रद्धा निर्मूलन चे नेते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणात, तब्बल अकरा वर्षांनी निकाल आल्यामुळे सर्वांचीच भावना, अशा प्रकारची झाली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना, त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षातील हल्लेखोरांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. यामध्ये अंदुरे आणि कळस्कर या दोन आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे. परंतु, डॉ. वीरेंद्रसिंग तावडे, ऍड संजीव पुनाळेकर आणि भावे या तिघांनाही सबळ पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले. मात्र, या संदर्भात पोलिसांना पुरावे शोधण्यामध्ये अपयश आल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. यात डॉ. तावडे, पुनाळेकर आणि भावे यांना अटक करण्यात आली होती. त्यांचा यामध्ये काही ना काही मानसिक सहभाग असण्याची बाब, निकाल पत्रात निश्चितपणे नोंदविण्यात आली. परंतु, त्या दिशेने तपास करण्यात तपास यंत्रणांना अपयश आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अर्थात, २०१३ मध्ये झालेला हा खून २०२४ पर्यंत खटला चालतो आणि या दरम्यान महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक विशिष्ट विचारांचे सरकार राहते. परंतु, आता ऐन निवडणुकीच्या काळात न्यायालयात अशा अतिशय गंभीर खटल्याचा निकाल जेव्हा लागतो तेव्हा, त्याच्यातून काही अर्थ सूचित होतो का? या दृष्टीनेही या निकालाचा विचार करावा लागतो. निश्चितपणे या खटल्यामध्ये जे हल्लेखोर दोषी झाले आहेत त्यात हल्लेखोरांच्या शैलीत नंतर गोविंद पानसरे, एम एस कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या अनुक्रमे २०१५ आणि सन २०१७ मध्ये खून करण्यात आले होते. त्यांच्याही खुनाची पद्धती अगदी दाभोळकरांचा खून झाला, त्याच पद्धतीची होती. त्यामुळे या चारही खुनामध्ये समान कार्यशैली आणि समान विचारसरणी असलेल्यांचाच हात आहे,

याला मात्र बळ मिळाले आहे! अर्थात, या प्रकरणातही तपास यंत्रणा मुख्य सूत्रधारापर्यंत  पोहचू शकल्या नाहीत; असा आरोप डॉ. हमीद दाभोळकर यांनी केला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात निर्दोष सोडण्यात आलेल्या आरोपींच्या विरोधात आव्हान दिले जाईल, असे डॉ. हमीद दाभोळकर म्हणाले. अर्थातच हा खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत निश्चितपणे जाईल, असे संकेत आत्ताच दिसत आहेत. या खटल्यामध्ये प्रामुख्याने ज्या संस्थेला संशयास्पद म्हणून घेरण्यात आले आहे, त्यामध्ये सनातन हे नाव प्रामुख्याने गाजले होते. अजूनही त्या संदर्भात हमीद दाभोळकर यांनी पुढे लढा देण्याची एक जिद्द दाखवली आहे. त्यामुळे आणखी काही काळ या खटल्यातील सूत्रधार कोण आहेत, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. अर्थात, दरम्यानच्या काळामध्ये देशात आणि राज्यात सरकारेही बदलण्याचे संकेत मिळत आहेत. अशावेळी या खटल्यामध्ये काही वेगवान घडामोडी घडू शकतात का, येणाऱ्या काळामध्ये ही बाब देखील औत्सुक्य पूर्ण झाली आहे. अजूनही, गोविंद पानसरे, एम. एस. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या संदर्भात न्यायालयात निकाल लागावयाचा आहे. एकमात्र, दिसतं की,  डॉ. दाभोळकर खटल्याचा निकाल लागणे, हा देखील राजकीय सत्ताबदलाचा संकेत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लवकरच इतर विचारवंतांच्या खून प्रकरणात निकाल येईल, अशी अपेक्षा करूया.

COMMENTS