Homeताज्या बातम्यादेश

हरियाणात भाजप सरकार कोसळणार ?

सरकार अल्पमतात असल्याचा काँगे्रसचा दावा

नवी दिल्ली ः देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच हरियाणामध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण हरियाणामध्ये भाजप सरकार अल्पम

Aurangabad :कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वारसांना मदतनिधी देण्याचे काम युद्धपातळीवर | LOKNews24
अमरावतीमध्ये अपघातात तिघांचा मृत्यू
शांततापूर्ण सहअस्तित्वानेच जगाची भरभराट !

नवी दिल्ली ः देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच हरियाणामध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण हरियाणामध्ये भाजप सरकार अल्पमतात असून, राज्यपालांनी विधानसभेत भाजपला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्याची मागणी काँगे्रस नेत्यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे हरियाणामध्ये भाजप सरकार कोसळणार की तरणार, याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी हरियाणाच्या पत्र लिहिले आहे. यात चौटाला यांनी म्हटले आहे की, राज्यपालांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून भाजपला विश्‍वासदर्शक ठरावाला सामौरे जावे, अशी मागणी केली आहे. सध्या हरियाणातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेल्या तीन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणी काँगे्र्रस सत्ता-स्थापन करण्याचा दावा करू शकते. यासंदर्भात बोलतांना दुष्यंत चौटाला म्हणाले की, आम्ही सध्याच्या सरकारला पाठिंबा देत नाही आणि हरियाणात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देण्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत. दुष्यंत चौटाला यांनी पत्रात लिहिले की, दोन आमदारांच्या राजीनाम्यानंतर सभागृहाचे संख्याबळ 88 झाले आहे. अशा स्थितीत भाजपकडे 40, काँग्रेसकडे 30, जेजेपीकडे 6, हलोपा आणि आयएनएलडीकडे प्रत्येकी 1 आमदार आहे. त्यामुळे सरकारकडे बहुमताचे आकडे नाहीत. दुष्यंत चौटाला यांनी लिहिले की, तीन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. दुष्यंत चौटाला यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे की, सरकारकडे विश्‍वासदर्शक ठराव नाही, त्यामुळे सरकारने विधानसभेचे अधिवेशन बोलावून फ्लोअर टेस्ट पास करावी. मुख्यमंत्री नायब सैनी यांनीही या विषयावर बोलतांना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचे नेते त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सरकार अल्पमतात नसून जोरदार काम करत आहे. सरकारला कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याचा दावा केला आहे.

हरियाणातील पक्षीय बलाबल – हरियाणा राज्यामध्ये बरीच मोठी राजकीय उलथापालथ होतांना दिसून येत आहे. हरियाणा विधानसभा ही 90 आमदार असणारी विधानसभा आहे. मात्र माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि आझाद रणजीत चौटाला यांच्या राजीनाम्यानंतर सध्या 88 आमदार आहेत. तर नायब सैनी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 45 आमदारांचे पाठबळ असणे आवश्यक आहे. मात्र भाजपकडे सध्या 44 आमदारांचे पाठबळ आहे. ज्यामध्ये भाजपचे 40, आझादचे 2 आणि हरियाणा लोकहित पार्टीचे 1 आमदार गोपाल कांडा यांचा समावेश आहे. तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे भाजपसमोरील अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. भाजपने 12 मार्च रोजीच खट्टर यांना हटवून नायब सैनी यांना हरियाणाचे नवे मुख्यमंत्री बनवले होते.

COMMENTS