Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाईफ केअर कार्डीयक सेंटर तर्फे  मोफत हृदय रोग निदान शिबीराचा 400 रुग्णांनी घेतला लाभ

नाशिक : हृदयविकारासंदर्भात सर्व सुविधा एकाच ठिकाणी असणाऱ्या लाईफ केअर कार्डीयाक सेंटर तर्फे 1 ते  31 एप्रिल 2024 या काळात घेण्यात आलेल्या मोफत  ह

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न | LOKNews24
अनिल परब यांच्या दापोली येथील रिसोर्टवर हातोडा
रेल्वे प्रवाशांना मिळणार ताबडततोब उपचार

नाशिक : हृदयविकारासंदर्भात सर्व सुविधा एकाच ठिकाणी असणाऱ्या लाईफ केअर कार्डीयाक सेंटर तर्फे 1 ते  31 एप्रिल 2024 या काळात घेण्यात आलेल्या मोफत  हृदयरोग निदान शिबीरात 400 हून अधिक रुग्णांनी लाभ घेतल्याची माहिती लाईफ केअर हॉस्पिटल संचालक डॉ.उमेश मराठे व हृदयविकार तज्ञ डॉ. सुरेश पाटील, डॉ महेश आहेर,डॉ प्रसाद अंधारे यांनी दिली. डॉ . पाटील म्हणाले की, 1 ते 31  एप्रिल 2024 या महिन्यात मोफत  हृदयरोग निदान शिबीरात 400 हून लाभ घेतला. यामध्ये 298 रुग्णांचा 2D इको करण्यात आला . त्याचप्रमाणे 45 लोकांची अँजिओग्राफी करण्यात आली असून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्यं योजने अंतर्गत 25 रुग्णांची मोफत अँजिओप्लास्टी करण्यात आली. ज्या रुग्णांना वारंवार छातीत दुखणे, पाय सुजणे, जीव घाबरा होणे, रक्तदाब कमी – अधिक होणे, धाप लागणे, खांद्याला किंवा हाताला वेदना होणे अशा प्रकारची लक्षणं दिसत असतिल त्यांनी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले  हृदयविकारा विषयी कुठलीही शंका असल्यास  संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

COMMENTS