Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्त्रियांनी योग्य जीवनशैलीचा अंगीकार केल्यास निरोगी आयुष्य जगणे शक्य : डॉ. शीतल येवले

नाशिक : महिलांनी दैनंदिन कामकाज सांभाळतांना योग्य जीवनशैलीचा अंगीकार केल्यास निरोगी आयुष्य जगणे शक्य होण्यास मदत होईल असे प्रतिपादन लाईफ केअर हॉस

पेगॅसीस प्रकरणी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन
कालव्यात अंघोळीसाठी उतरलेले दोन तरुण गेले वाहून
बीड जिल्हाभूमि अभिलेख अधिक्षक शिंदे साहेबाची केज तालुक्यावर वक्रदृष्टी केजचे उप अधिक्षक पद रिक्तच

नाशिक : महिलांनी दैनंदिन कामकाज सांभाळतांना योग्य जीवनशैलीचा अंगीकार केल्यास निरोगी आयुष्य जगणे शक्य होण्यास मदत होईल असे प्रतिपादन लाईफ केअर हॉस्पीटलच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ.शितल येवले यांनी केले. राजीवनगर येथील नवचैतन्य महिला मंडळाच्या वतीने आयोजित जनजागृतीपर कार्यक्रमात डॉ. येवले बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मनिषा खैरनार, शैला मेतकर, स्मिता गहिवडे, उपस्थित होत्या. डॉ. शितल येवले पुढे म्हणाल्या की, स्त्रीयांमध्ये मुख्यत्वे करून मासिक पाळीच्या समस्या जास्त जाणवतात. रक्तस्त्रावामुळे हिमोग्लोबीन व शरीरातील लोह कमी होते. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे हाडांवर दुष्परिणाम होतो. महिलांनी पाळी बंद होते किंवा ज्या महिलांनी कमी वयात गर्भाशयाची पिशवी काढली जाते त्या महिलांमध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स कमी होत जातात. त्यामुळे हाडांची ठिसुळता महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त बघायला मिळते.

महिलांचा हाय प्रोटिन डाएट असला पाहिजे यामध्ये हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, फळे, कडधान्य, डाळी, पनीर आदींचा वापर करावा. दररोज ४५ मिनिटे व्यायाम यामध्ये चालणे, योगासन, सायकलिंग, पोहणे त्याचप्रमाणे पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे.

डॉ. येवले म्हणाल्या की, लाईफ केअर हॉस्पीटलमध्ये कॉल्पोस्कोपी सारखी महागडी तपासणी मोफत करून डॉक्टरांचा सल्लाही विनामुल्य दिला जातो. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गर्भपिशवीच्या गाठीची शस्त्रक्रिया, बीजाशयांच्या गाठीची शस्त्रक्रिया, गर्भ पिशवी शस्त्रक्रियेनंतर मयांग बाहेर येणे, बिजनलिका बंद असणे, योनीचा भाग खाली येणे, बीज नलिकेत गर्भ वाढणे, संतती नियोजनाची शस्त्रक्रिया उलटविणे, पीसीओडी शस्त्रक्रिया, गर्भाशय मुखावरील जखमा यासारख्या शस्त्रक्रिया हॉस्पीटलचे मुख्य स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. उमेश मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत केल्या जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS