Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विषारी इंजेक्शनमुळे पोलिस हवालदाराचा मृत्यू

फटका गँगच्या गुडांनी टोचले विषारी इंजेक्शन

मुंबई ः पुण्यात कोयता गँगचा उच्छाद असतांना आता मुंबईमध्ये फटका गँगने उच्छाद मांडला असून, त्यांनी विषारी इंजेक्शन एका पोलिस हवालदाराला टोचून त्याच

‘आप’चा आदर्श इतर पक्ष घेतील का ?
तुमचे आजचे राशीचक्र शुक्रवार, १७ जून २०२२ | LOKNews24 |
Mumbai : 10 लाखांची लाच घेतांना शाखा अभियंताला रंगेहाथ पकडले | LokNews24

मुंबई ः पुण्यात कोयता गँगचा उच्छाद असतांना आता मुंबईमध्ये फटका गँगने उच्छाद मांडला असून, त्यांनी विषारी इंजेक्शन एका पोलिस हवालदाराला टोचून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर आलीआहे. मुंबई पोलिसांच्या लोकल आर्मसमधील एका पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद परिस्थितीक मृत्यू झाला आहे. माटुंगा स्थानकाजवळ नशेखोरांनी या पोलीस कॉन्स्टेबलवर प्राणघातक हल्ला केला होता. या पोलीस कॉन्स्टेबलला चोरट्यांनी विषारी इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना बुधवारी समोर आली आहे. विशाल पवार असे या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे.
फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील हवालदाराचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत पोलीस हवालदार मुंबई पोलिसांच्या वरळी लोकल आर्म्स डिव्हिजन-3 मध्ये कार्यरत होते. दरम्यान, 28 एप्रिल 2024 रोजी माटुंगाजवळील रेल्वे रुळांवर फटका गँगने मयत पोलीस हवालदाराला विषारी इंजेक्शन टोचल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप केला जात आहे. दादर गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांच्या कर्मचार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पवार (वय, 20) असे विषारी इंजेक्शनमुळे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. विशाल हे सोमवारी (28 एप्रिल) मुंबई लोकलने ड्युटीसाठी जात होते. माटुंगा आणि सायन स्थानकांदरम्यान विशाल हे फोनवर बोलत असताना फटका गँगच्या एका सदस्याने त्यांच्या हातावर फटका मारला. यामुळे त्यांच्या हातातील फोन निसटून खाली पडला. यानंतर हा फोन घेऊन फटका गँगने पळ काढला. लोकलचा वेग कमी असल्याने विशाल यांनी खाली उतरून फटका गँगचा पाठलाग केला. काही अंतरावर गेल्यानंतर फटका गँगने विशाल यांना घेरले आणि धक्काबुक्की केली. विशाल यांनी प्रतिकार केला असता फटका गँगने त्यांच्या पाठीत विषारी इंजेक्शन टोचले. तसेच त्यांच्या तोंडात लाल रंगाचे द्रव ओतले. सोमवारी 9.30 वाजताच्या सुमारा ही घटना घडली. यानंतर विशाल जमीनीवर कोसळले. दुसर्‍या दिवशी शुद्दीवर आल्यानंतर विशाल घरी परतले. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या कुटुंबाने त्यांना सोमवारी ठाण्यातील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान पवार यांची प्रकृती खालावली आणि बुधवारी त्यांचा मृत्यू झाला, असे मध्य रेल्वेचे पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.

COMMENTS