Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमृतवाहिनीच्या 72 विद्यार्थ्यांना अमृत मेरीटोरीयस स्कॉलरशिप

संगमनेर ः उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी असलेल्या समन्वयामुळे विद्य

पैशाचे आमिष दाखवून वृद्धाचे 91 हजाराचे दागिने पळवले
रंधा धबधबा परिसरात घरफोडी
जामखेड नगरपरिषद कर्मचारी संपावर

संगमनेर ः उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी असलेल्या समन्वयामुळे विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी उपलब्ध करून देताना गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अमृत मेरीटोरीयस परीक्षेमध्ये 72 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली असल्याची माहिती विश्‍वस्त शरयूताई देशमुख यांनी दिली आहे.
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज मधील अमृत मेरीटोरीएस स्कॉलरशिप वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ.एम.ए.व्यंकटेश, अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव, रजिस्टर प्रा.विजय वाघे, डॉ.एम.आर वाकचौरे, प्रा.व्ही.वाय पाटील आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना देशमुख म्हणाल्या की, माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण देताना त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व संशोधन वृत्ती वाढावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या संस्थेतील ग्रामीण भागातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता असून त्या विद्यार्थ्यांना अमृत मेरीटोरीयस मधुन स्कॉलरशिप दिली जाते. यावेळी या स्कॉलरशिप मध्ये 72 विद्यार्थी गुणवंत ठरले असल्याचेही त्या म्हणाल्या. तर प्राचार्य डॉ.एम.ए व्यंकटेश म्हणाले की, महाविद्यालय स्वतंत्र प्लेसमेंट कक्ष सुरू असून त्या माध्यमातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विविध कंपन्या संस्थेमध्ये येऊन कॅम्पस इंटरव्यू घेत असतात यामधून अनेक विद्यार्थ्यांना थेट नोकर्‍या मिळत असून मागील वर्षी 476 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. एनबीए मानांकन, नॅक चा  ए प्लस दर्जा,याचबरोबर आयएसओ मानांकन यासह विविध ग्रेड संस्थेला मिळाले असल्याचेही ते म्हणाले. या स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील सहा महिन्यासाठी सहा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.व्ही.वाय पाटील यांनी केले.सूत्रसंचालन मनीषा लांडगे यांनी केले तर डॉ.एम.आर.वाकचौरे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS