Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यात निवडणुकीनिमित्त कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण उत्साहात

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी ः अहमदनगर दक्षिण लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 अंतर्गत 226 श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर नियुक्त करण्

सुशांत घोडके यांना वनश्री राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
कोल्हे कारखान्याच्या पाच शेतकरी सभासदांना ऊस शेतीचे प्रशिक्षण
कर्जत तालुक्यात डोक्यात दगड घालून खून

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी ः अहमदनगर दक्षिण लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 अंतर्गत 226 श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे सकाळी 10 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाचे वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत उपजिल्हाधिकारी भूसंपादन अहमदनगर व श्रीगोंद्याच्या तहसीलदार डॉ.क्षितिजा वाघमारे निवडणूक नायब तहसीलदार पंकज नेवसे आदींनी प्रशिक्षणास हजर राहून संबंधित नियुक्त कर्मचार्‍यांना निवडणुकी कामी सखोल असे मार्गदर्शन केले.
      सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत मॅडम यांनी सर्व कर्मचार्‍यांना मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी सदर नियुक्त कर्मचार्‍यांचे कर्तव्य व जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सदर प्रशिक्षणास जवळपास 478 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आल्या त्यापैकी 420 कर्मचारी प्रशिक्षण वर्गात हजर होते. उर्वरित गैरहजर कर्मचार्‍यांनी हजर न झाल्यास त्यांच्यावर लोकप्रतिनिधी कायदाअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. असे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले असून तशा सूचना बजावण्यात आले आहेत. निवडणुकी कामी संबंधित कर्मचार्‍यांनी कर्तव्यावर हजर व्हावे. जे कर्मचारी गैरहजर होते. त्यांनी निवडणुकीकामी तात्काळ हजर व्हावे. असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.

COMMENTS