Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोसेवा आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन

अहमदनगर ः राज्यात गो मातेच्या रक्षणासाठी गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. अशा प्रकारचा आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य अस

लम्पी आजार प्रतिबंधासाठी ठोस पावले उचला – डॉ. अजित नवले
भविष्यात पर्यटन क्षेत्रात मोठी संधी- किशोर मरकड 
सेवेतील अधिकार्‍याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास मिळणार नोकरी l DAINIK LOKMNTHAN

अहमदनगर ः राज्यात गो मातेच्या रक्षणासाठी गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. अशा प्रकारचा आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याची माहीती महसुल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
नगर शहरातील गो-रक्षण करणारे कार्यकर्ते तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी मंत्री विखे पाटील यांनी संवाद साधला. तसेच गोरक्षणाबाबत काम करताना येत असलेल्या अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात गोसेवा आयोग स्थापन करुन, गो मातेचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल टाकले गेले. केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावरील गोसेवा आयोग स्थापन केला.  त्याच धर्तीवर राज्य गोसेवा आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी गोमातेच्या  संरक्षणासाठी काम करताना येत असलेल्या अडचणीही मंत्र्यासमोर विषद केलेल्या अडचणींची गांभिर्याने दखल घेण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली. या बैठकीस सकल हिंदु समाजाचे प्रतिनिधी, विश्‍व  हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS