Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जि.प. शिक्षण विभागाचे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी नियोजन सुरू

नाशिक : जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभाग (प्राथमिक) आणि सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधि

धनंजय महाडिक यांची राज्यसभेवर निवड; राष्ट्रवादी कार्यकर्ते महाडीक यांच्या संपर्कात
कोरडा दुष्काळ जाहीर करून पीक विमा मंजूर करा
आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर

नाशिक : जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभाग (प्राथमिक) आणि सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांचे प्रशिक्षण सत्र घेण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांचे “PGI निर्देशके आणि या शैक्षणिक वर्षासाठी ध्येयनिश्चिती” या विषयांवर विशेष सत्र घेण्यात आले.दि. २३ एप्रिल रोजी नाशिक येथील द वन हॉटेल येथे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक वृद्धीसाठी अधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, चांगले विद्यार्थी घडण्यासाठी शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येक घटकाने योगदान द्यावे असे सांगितले तसेच उपस्थित सहभागींकडून सद्यस्थितीत चालू असलेल्या प्रकल्पांविषयी संवाद साधला. त्याचबरोबर नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी शिक्षण विभागातील अधिकारी यांचे वेतन विषयक  प्रश्न जाणून घेतले आणि त्यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस संस्थेचे शैलेश तवर, नाशिक जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, पंचायत समिती सहाय्यक प्रशासन अधिकारी, शालार्थ कामकाज करणारे कर्मचारी हे उपस्थित होते.

COMMENTS