Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मूलभूत प्रश्‍न सोडवा अन्यथा आंदोलन ः हर्षदाताई काकडे

शेवगाव तालुका ः शहरासाठीचा दररोज स्वच्छ पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती व सांडपाणी व्यवस्थापन पूर्ववत करा अन्यथा जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने व्यापक

अखेर कामगार वसाहतीतील वीजपुरवठा सुरळीत
दीपक करगळ यांची 5 हजार किलो आंब्यांची साई प्रसालयात देणगी
गौतमी पाटीलची ‘पाटलांचा बैलगाडा’ गाण्यावर तरुणाशी जुगलबंदी

शेवगाव तालुका ः शहरासाठीचा दररोज स्वच्छ पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती व सांडपाणी व्यवस्थापन पूर्ववत करा अन्यथा जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने व्यापक स्वरूपाचे लक्षवेधी आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील विविध भागातील नागरिकांना सोबत घेऊन जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे यांनी शेवगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना शेवगाव येथे दिले.
यावेळी काकडे म्हणाल्या की, शेवगाव शहरातील खंडोबानगर, विद्यानगर, माउली नगर, जिजाऊनगर, मल्हार नगर, पटेल रो हाउसिंग, महादेव नगर, माळीवाडा परिसरात संवाद दौर्‍याच्या निमित्ताने फिरतांना असे लक्षात आले की शेवगाव शहराची पाण्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. शेवगाव शहराला पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे संपूर्ण शेवगाव शहरातील नागरिकांचा नगरपरिषदेवर संताप आहे. आजी माजी लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे शेवगावकरांवर ही वेळ आलेली आहे. शेवगाव शहरातील पाणी तसेच सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्‍न आहे. बंदिस्त गटारीची सोय नाही. त्यामुळे उघड्या नाल्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. हीच परिस्थिती रस्त्यांच्या संदर्भात आहे. नगर पालिका स्वच्छ पाणी पुरवठा, रस्ते गटारी आदि नागरी सुविधा देण्यात असमर्थ ठरलेली दिसते. शेवगावला पाणी वितरण व्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी आहेत. पाणी वितरणात वशिलेबाजी होते. अनेक वेळा मागणी करुनही विविध कारणे दाखवून प्रत्येक प्रश्‍नांकडे टाळाटाळ केली जाते. शेवगाव शहरामध्ये पाण्याप्रमाणेच सांडपाण्याचा, उघड्या नाल्याचा, रस्त्याच्या प्रश्‍नासंदर्भात नगरपरिषद पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. शेवगाव शहराचे वरील प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण तातडीने योग्य ती पाऊले उचलून शेवगाव शहराला पिण्याचे शुद्ध पाणी दररोज मिळावे तसेच रस्ते दुरुस्ती व सांडपाणी व्यवस्थापनासाठी योग्य ते नियोजन करावे अन्यथा शेवगाव शहरातील सर्व स्त्री-पुरुषांना घेवून कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता ‘न भूतो न भविष्यती’ अशा स्वरूपाचे जनआंदोलन केले जाईल असेही काकडे यावेळी म्हणाल्या. यावेळी मुख्याधिकारी यांनी 8 दिवसात शहराचा पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत करू असे आश्‍वासन दिले. यावेळी अकबर शेख, वैभव जोशी, भिवसेन पाठक, मिनाक्षी पाठक, दानियाल घरवाढे, अनिल वेदपाठक, प्रमोद जोशी, मुकुंद अंचावले, सुरेश जायभाये, दिगंबर घेवारी, श्रीराम कोळपे, हरीश भालेराव, शिवाजी तमानके, ज्ञानेश्‍वर तमानके, भगवान गायकवाड, बाळासाहेब शिरसाठ, संतोष ढोले, धिरज शिंदे, संजयकुमार पाटेकर, कमल पाटेकर, प्रमिला ढाकणे, छायाबाई ढाकणे, ज्योती वेदपाठक, गीता वेदपाठक, राधा जोशी, डॉ जोशी बाई, भालेराव मावशी, शिला गव्हाणे, आशा ढोले, सारिका बोडखे , मोहिनी पाटेकर, अरुणा जायभाय, नंदा शिंदे. ढाकणे ज्योती, शांताबाई ढाकणे, सविता ढाकणे, विजया जोशी, शुभांगी म्हस्के, विजया देशपांडे, वैशाली कोळपकर, अनिता घनवट, ताई निकाळजे, वैशाली आवारे, गंगा नागरे, चंद्रकला वाघुंबरे, अनिता गायकवाड, केदारताई खरमाटे आदि असंख्य महिला व नागरिक उपस्थित होते.

COMMENTS