Homeताज्या बातम्यादेश

मलेशियात हवेत दोन हेलिकॉप्टरची टक्कर

या दुर्घटनेत 10 क्रू मेंबर्सचा मृत्यू

नवी दिल्ली : मलेशियामध्ये नौदलाच्या संचलन सोहळ्याच्या वेळी सुरू असलेल्या लष्करी सरावादरम्यान, हवेत दोन हेलिकॉप्टरची धडक झाली. या घटनेत 10 नागरिक

ऊस कारखाना फायद्यात आणण्यासाठी ‘इथेनॉल’ निर्मिती कडे वळावे – पालकमंत्री हसन मुश्रीफ
आमदाराच्या गाडीने सात पोलिसांसह २२ जणांना चिरडले | LOKNews24
अखेर सुजीत पाटकरला जामीन मंजूर

नवी दिल्ली : मलेशियामध्ये नौदलाच्या संचलन सोहळ्याच्या वेळी सुरू असलेल्या लष्करी सरावादरम्यान, हवेत दोन हेलिकॉप्टरची धडक झाली. या घटनेत 10 नागरिक ठार झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 9.32 वाजता घडली असून या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये 10 क्रू मेंबर्स होते, असे नौदलाने सांगितले. मृतांची ओळख पटवण्यासाठी सर्व मृतदेह हे लुमुट आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्याचे मलेशीयन नौदलाने सांगितले. मलेशिया येथे नौदलदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त नौदलाच्या जवानांचे संचलन सोहळा होणार होता व यात लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या हवाई कसरतीदेखील सादर केल्या जाणार होत्या. या सोहळ्याची पूर्वतयारी मलेशियातील मुमूट शहराजवळ असलेल्या नौदलाच्या तळावर सुरू सुरू होती. या हवाई कसरतींच्या प्रात्यक्षिकाची तयारी करत असतांना दोन लष्करी हेलिकॉप्टर हवेत धडकले. या वेळी काही नागरिक देखील हा पूर्व तयारी सोहळा पाहत होते. दरम्यान, हेलिकॉप्टर हवेत धडकल्याने खाली कोसळले. ही संपूर्ण घटना व्हिडिओत  कैद झाली आहे. या घटनेत हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या 10 अधिकार्‍यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत दोन्ही हेलिकॉप्टरमधील जवान ठार झाले आहेत. या अपघाताचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यात एका हेलिकॉप्टरने दुस-याच्या हेलिकॉप्टरच्या रोटरला धडक दिल्याचे दिसत आहे. यामुले हे दोन्ही हेलिकॉप्टर क्रॅश झाले. यातील एक हेलिकॉप्टर धावत्या ट्रॅकवर कोसळले तर दुसरे जवळच्या स्विमिंग पूलमध्ये कोसळले.

COMMENTS