Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारामतीत रंगला ’तुतारी’ चिन्हाचा वाद

अपक्ष उमेदवाराला दिले तुतारी चिन्ह

पुणे ः महाराष्ट्रातील हाय होल्टेज निवडणूक म्हणून बारामतीकडे बघितले जात आहे. या निवडणुकीत नणंद विरूद्ध भावजय असा सामना रंगणार असतांनाच दुसरीकडे तु

नगरमध्ये समस्या…दूषित पाणी-खड्डे-बंद पथदिवे-मोकाट कुत्री व जनावरे
खारघर प्रकरणी सरकारने राजीनामा द्यावा
राजस्थान भाजपतील वाद चव्हाट्यावर

पुणे ः महाराष्ट्रातील हाय होल्टेज निवडणूक म्हणून बारामतीकडे बघितले जात आहे. या निवडणुकीत नणंद विरूद्ध भावजय असा सामना रंगणार असतांनाच दुसरीकडे तुतारी चिन्हाचा वाद समोर आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँगे्रसला माणूस असलेले तुतारी चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे. यासोबतच निवडणूक आयोगाने बारामती लाकसभेसाठी अपक्ष उभे असलेले सोहेल शेख यांना तुतारी चिन्ह दिल्यामुळे नवा वाद निर्माण होतांना दिसून येत आहे. सोहेल शेख यांना तुतारी चिन्ह दिल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेतला आहे.
यासंदर्भातील सविस्तर महिती अशी की, बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार्‍या आणि मुळच्या बीड जिल्ह्यातील असलेल्या सोयल शेख यांना निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह आधीच मिळालेले असताना अपक्ष उमेदवाराला देखील तुतारी हे चिन्ह देण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने याला आक्षेप घेतला आहे. मात्र, हा आक्षेप डावलून सोयल शेख यांना तुतारी चिन्ह देत असल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या  मुख्य निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी जाहीर केले.

आयोगाकडून ट्रम्पेटचे भाषांतर तुतारी – बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार्‍या सोयल शेख यांना मिळाले निवडणूक चिन्ह हे ट्रम्पेट हे आहे. ट्रम्पेट हे ब्रिटीश वाद्य असून बँड वादनात त्याचा समावेश होतो. मात्र, या ट्रम्पेटचे मराठी भाषांतर निवडणूक आयोगाकडून तुतारी असे करण्यात आले आहे. अपक्ष उमेदवाराला दिलेल्या ट्रम्पेट या चिन्हाचा उल्लेख निवडणूक आयोगाने तुतारी असे केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून याला आक्षेप घेण्यात आला. सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबीया यांनी त्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्याचबरोबर हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS