Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी शहरात रामनवमीनिमित्त भव्य मिरवणूक

महाकाल अघोरी पथक ठरले मुख्य आकर्षण

पाथर्डी ः श्रीराम नवमी निमित्त पाथर्डी शहरातील हिंदू रक्षा युवा मंचाने नेत्रदीपक भव्य मिरवणूक काढली सायंकाळी वामनभाऊनगर येथील श्री स्वामी समर्थ म

अहमदनगरचे नाव शाह शरीफ नगर करा…
पथनाट्यातून जनजागृती; संगमनेर परिषद व संगमनेर महाविद्यालयाचा उपक्रम
अकोले शहरातील गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे : मच्छिंद्र मंडलिक

पाथर्डी ः श्रीराम नवमी निमित्त पाथर्डी शहरातील हिंदू रक्षा युवा मंचाने नेत्रदीपक भव्य मिरवणूक काढली सायंकाळी वामनभाऊनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरापासून या मिरवणुकाला शंकर महाराज भक्ती मठाचे माधव बाबा, रेणुका माता मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन प्रशांत भालेराव यांच्या हस्ते पालखी पूजन करून मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली.
या मिरवणुकीत एकूण बारा देखावे सादर करण्यात आले तर मिरवणुकीत  महाकाल अघोरी पथकातील कलाकारांचे नृत्य व आघोरी कला कलावृत्त आविष्कार मुख्य आकर्षण ठरले. रामराज्य ढोल-ताशा पथ, छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्यभिषेक सोहळानिमित्त देखावा,रामराज्य महिला पथक संस्कार रेवा, लहुजी वस्ताद प्रतिष्ठान श्रीराम, शबरी भेट, स्वामी समर्थ सेवा केंद्र मुल्य शिक्षण ग्राम अभियान, महाकाल देखावा,दिव्य ज्योती जागृती संस्थान, साई प्रतिष्ठान मारीच वध देखावा, श्री संत सावता महाराज दिंडी रथ, सुवर्णयुग परिवार ट्रस्ट वारकरी पथक, पालखी आदीं देखावे मिरवणूकीत सहभागी झाले होते.यावेळी मिरवणुकीला खासदार डॉ सुजय विखे,आमदार मोनिका राजळे, अ‍ॅड प्रताप ढाकणे, शितिज घुले, डॉ. मृत्यूंजय गर्जे, अभय आव्हाड, अर्जुन शिरसाट, सुभाष घोडके, नंदकुमार शेळके, अमोल गर्जे, अशोक चोरमले, बंडु बोरुडे,विष्णुपंत अकोलकर, अँड प्रतीक खेडकर, प्रशांत शेळके, प्रसाद आव्हाड, शुभम गाडे आदींनी उपस्थिती लावली होती. मिरवणूक मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा भगवी झालर, स्वागत कमानी लावण्यात आल्या होत्या.तसेच जैन युवक, मुकुंद लोहिया मित्र मंडळ  मित्रमंडळाच्या वतीने मिरवणुकी दरम्यान सरबत वाटण्यात आले.पालखी मिरवणुकीचा समारोप शहारातील कसबा पेठेतील दक्षिणमुखी पोळा मारुती मंदिर येथे करण्यात आला.

COMMENTS