जामखेड ःरत्नदीपचे संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर निकाल येण्यापूर्वीच सदर जामीन अर्ज माघारी घेत
जामखेड ःरत्नदीपचे संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर निकाल येण्यापूर्वीच सदर जामीन अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे डॉ भास्कर मोरेंचा तुरूंगातला मूक्काम वाढला आहे. भास्कर मोरे विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकेत आहेत. जामखेड न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर सत्र न्यायालयानेही जामीन नाकारला होता. त्यामुळे डॉ. भास्कर मोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज 916 जामीन अर्ज क्र. 2024 चा 608 दाखल केला होता. 16 एप्रिल रोजी त्यावर सूनावणी झाली होती. 18 रोजी निकाल येणार होता, मात्र निकाल येण्यापूर्वीच डॉ. भास्कर मोरे यांच्याकडून जामीन अर्ज माघारी घेण्यात आला. त्यामुळे जामीन अर्ज माघारी घेण्यामागचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे. जामीन अर्जासाठी युक्तीवाद करतांना काही त्रुटी राहिल्या की, पुन्हा नव्या युक्तीवादासह नव्याने जामीन अर्ज करणार आहे, याचा अद्याप खुलासा झालेला नाही.
जामीन अर्ज डॉ. भास्कर मोरेंनी माघारी का घेतला कारण स्पष्ट समजले नाही मात्र तूरूंगातला मुक्काम वाढला हे खरं आहे. तसेच उच्च न्यायालयाने ऑर्डर केली आहे की, चार्ज सिट दाखल केल्यानंतर तुम्ही खाली लिबरटी कोर्टात जामीन मांडू शकता. सरकारपक्षाकडून वरिष्ठ वकील व्ही. डी. सपकाळ, अँड संदिप आर. सपकाळ आणि अॅड ओंकार रामेश्वर वाघुले, तर अर्जदारातर्फे अॅड श्रीमती प्रतिभा जे. भरड, उत्तरदायी/राज्यासाठी एपीपी, वसंत दिगंबरराव साळुंके, ड पी.पी.कोरम संजय ए. देशमुख, यांनी काम पाहिले.
COMMENTS