कोपरगाव तालुका ः प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमीत्त शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला पायी जाणार्या साईभक्तांना युवा नेते विवेक कोल्ह
कोपरगाव तालुका ः प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमीत्त शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला पायी जाणार्या साईभक्तांना युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव-शिर्डी रस्त्यावर समृद्धी उड्डाणपूलाखाली सुगंधी दूध वाटप करण्यात आले. युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठान अनेक सामाजिक कार्य करत आहे. यामध्ये दरवर्षी सर्व धर्मिय सामुदायिक सोहळ्याचे दिव्य असे आयोजन करण्यात येते.यंदाही आयोजन करण्यात आले आहे. पूरग्रस्तांना मदत असो, थोर पुरुषांच्या जयंती, पुण्यस्मरणा निमीत्त व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. गड किल्ल्यांचे स्वच्छता अभियान असे सामाजिक कार्य या संस्थेच्या वतीने करण्यात येते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्या युवकांचे संघटन असल्याने संजीवनी युवा प्रतिष्ठान या संस्थेचा नावलौकिक उल्लेखनीय ठरतो आहे.
श्रीराम जन्मोत्सव आणि शिर्डीचे साईबाबा यांची एक आध्यत्मिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. याच धारणेतून दरवर्षी हजारोभक्त रामनवमी निमीत्त साईबाबांच्या दर्शनाला जात असतात. त्यामुळे येवला, मनमाड, वैजापूर, कोपरगाव, जेऊर कुंभारी, धारणगाव आदी गावातील पालख्या व पायी साईभक्त शिर्डीच्या दिशेने जात असतांना समृद्धीच्या उड्डाण पुलाखाली युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुगंधी दूध वाटप करण्यात आले. यावेळी कोल्हे यांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. साई नामाचा जयघोष करीत नाचण्याचा आनंद घेतला. त्यानंतर भाविकांनी या भागात जी अस्वच्छता केली होती, ती स्वच्छता प्रतिष्ठानच्या वतीने विवेक कोल्हे यांनी जातीने लक्ष घालून परिसर स्वच्छ केला. या प्रसंगी बाळासाहेब पानगव्हाणे, अमोल गवळी, सिद्धार्थ साठे, सतीश आव्हाड, रवी रोहमारे, रामदास गायकवाड, प्रसाद आढाव, रोहित कणगरे, स्वप्नील कडू , सागर राऊत, सचिन सावंत, जयप्रकाश आव्हाड, गोपीनाथ गायकवाड, कृष्णकांत गवळी, संतोष गवळी, धनंजय माळी, दत्तू नाना संवत्सरकर, रुपेश सिनगर, रविंद्र लचुरे, कुणाल आमले, अनिल जाधव, सोमनाथ वाळुंज, सतीश निकम, समाधान कुर्हे, स्वराज सूर्यवंशी, भैय्या नागरे, वैभव सोळसे, मंगेश पवार, राहुल माळी, विक्की परदेशी, अमोल बागुल, ऋषिकेश निकम, तुषार मवाळ, आदींसह पदाधिकारी व साईभक्त उपस्थित होते.
भक्तांच्या आरोग्यासाठी फिरता दवाखाना उपलब्ध – कोपरगांव-शिर्डी रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याची एकच बाजू वाहतुकीसाठी खुली होती. रस्त्यांवर वाहनाची गर्दी होती. त्यात पदयात्री पायी चालतांना कोणालाही कुठलाही त्रास झाल्यास संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने फिरता दवाखाना उपलब्ध करून देण्यात आला होता. या दवाखान्याचा भाविक लाभ घेत होते, तर भाविकांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने रुग्णवाहिकाही प्रतिष्ठानच्या वतीने सेवेत ठेवण्यात आली होती.
COMMENTS