Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचाही स्पर्धा परीक्षेत डंका : कुमावत

हर्षद बंडू उंबरे विद्यार्थ्याची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश निवड

अकोले ः आदिवासी भागातील शिक्षक विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शन करत असल्याने आता विद्यार्थी नवोदय, शिष्यवृत्ती सारख्या स्पर्धा परिक्षेत चमकत आ

सावेडीतील बहुचर्चित रस्ता अखेर गुंडाळला ; अर्धवट अवस्थेतील काम मनपाने केले रद्द, शासनाला पैसेही परत पाठवले
कोपरगावातील रस्त्यांसाठी 1.80 कोटी निधी मंजूर – आ. आशुतोष काळे
कुपोषण मुक्तीसाठी पोषण आहार चळवळ यशस्वी करा : मनोज ससे

अकोले ः आदिवासी भागातील शिक्षक विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शन करत असल्याने आता विद्यार्थी नवोदय, शिष्यवृत्ती सारख्या स्पर्धा परिक्षेत चमकत आहेत. यात शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचीही मेहनत असून त्यांचे कौतुक झाले पाहिजे असे प्रतिपादन कोतूळ बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा पी.एम. पोषणचे अधिक्षक अरविंद कुमावत यांनी केले.
कुमावत यांनी जि.प.प्रा.शा.जांभळेवाडी (सातेवाडी) येथील इयत्ता पाचवीत शिकत असलेला विद्यार्थी कु.हर्षद बंडू उंबरे याची नवोदय विद्यालय प्रवेश निवड झाली मागील वर्षी पवन सोमनाथ बारे याची निवड झाली होती. त्याबद्दल सदर विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक अजय चौधरी यांचा सत्कार केला तसेच शिक्षक भाऊसाहेब कडू, संपत दिघे व अमोल आहेर यांचा देखील शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी सत्कार करण्यात आला. कुमावत म्हणाले, विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकवायचे असेल तर त्यात शिक्षकाची भूमिका महत्वाची असते. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करण्याची गरज असून ती भूमिका जांभळेवाडी केंद्रातील शिक्षक योग्य पद्धतीने बजावत आहेत याचा मला अभिमान आहे.

COMMENTS