कोरोनाबाधितांच्या मृत्यूनंतर दागिने, रोकड लंपास

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाबाधितांच्या मृत्यूनंतर दागिने, रोकड लंपास

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये चोरीचे प्रकार घडत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर त्यांचे मौल्यवान वस्तू, दागिने, रोकड याची चोरी झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे रुग्ण व मृतांच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे धाव घेतली. 

औसा येथे कृषीमंत्र्यांच्या प्रतिमेस काद्यांचा हार अर्पण
सामाजिक बांधिलकीतून जनसेवेचे व्रत प्रेरणादायी
भाऊजीने केला मेहुण्याचा खून

पुणे/प्रतिनिधीः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये चोरीचे प्रकार घडत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर त्यांचे मौल्यवान वस्तू, दागिने, रोकड याची चोरी झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे रुग्ण व मृतांच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे धाव घेतली. 

    मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार असल्याच्या संतप्त भावना नातेवाइकांनी व्यक्त केल्य आहेत. महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे ऑटो क्लस्टर व नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. शहर तसेच जिल्ह्यातीलही रुग्ण येथे दाखल करण्यात येत होते. रुग्ण दाखल करून घेताना दागिने, पाकिट, रोकड, मौल्यवान वस्तू त्यांच्या जवळच ठेवण्यात येतात. उपचारादरम्यान रुग्णाची तब्येत खालावल्यास त्याच्याकडील साहित्याची चोरी करण्याचे प्रकार झाले. तसेच उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यांचे साहित्यही लंपास करण्यात आले. 

कोविड सेंटरमध्ये सामान्य नागरिक तसेच रुग्णाचे नातेवाइकांना प्रवेश नसल्याने चोरट्यांचे अधिक फावले. सेंटरमध्ये कार्यरत असलेले किंवा तेथे सहज प्रवेश मिळणार्‍यांनी या साहित्याची चोरी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रुग्ण किंवा मृतांच्या खिशातील पाकिटही चोरट्यांनी चोरून नेले. चोरट्यांनी महिला रुग्णांचे सौभाग्याचे लेणेदेखील लंपास केले. त्यामुळे इतर रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली. कोविड सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी पोलिसांनी केली; मात्र केवळ लाइव्ह चित्रण होते, त्याचे रेकॉर्डिंग होत नाही, असे समोर आले. त्यामुळे तपासातील अडचणी वाढल्या. यात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांना मदतीसाठी पोलिसांकडून हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

COMMENTS