Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विनयभंग करणार्‍या अधिकार्‍यांना येरेकरांचा आशीर्वाद ?

जिल्हा परिषदेचे शिक्षक वावरतात अदृश्य हुकुमशाहीत डॉ. अशोक सोनवणे/अहमदनगर : सहकाराचा बालेकिल्ला म्हणून अहमदनगर जिल्ह्याकडे बघितले जाते. सहक

अहमदनगर जिल्ह्याच्या ठळक बातम्या | आपलं अहमदनगर | LokNews24
वकीलांचा आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार
बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा : सतीश पाटील

जिल्हा परिषदेचे शिक्षक वावरतात अदृश्य हुकुमशाहीत

डॉ. अशोक सोनवणे/अहमदनगर : सहकाराचा बालेकिल्ला म्हणून अहमदनगर जिल्ह्याकडे बघितले जाते. सहकार आणि शिक्षण या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, अहमदनगर जिल्ह्यात गतकाळापासून शिक्षकांचा आदरच करण्यात आला. गुरुजींनी शिकवलेले आदर्शवादी धड्यांनीच कुटुंब आणि गाव समृद्ध होते. संस्काराचा शिल्पकार या नजरेने गुरुजनांकडे पाहिले जाते. सध्या अहमदनगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दुजाभावाच्या अनागोंदी कारभारामुळे अधिकारी वर्ग आता महिलांचा विनयभंग करण्यासाठी पुढे सरसावत असून त्या अधिकार्‍यावर कारवाई करण्यास चाललेली चालढकल बघून बहुजन महिला शिक्षकांचा विनयभंग करण्यास नकळत येरेकरांचा आशीर्वाद असल्याची चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीला जिल्हा परिषदेचे शिक्षक अदृश्य हुकुमशाहीच्या छायेत वावरत आहे.
अक्षरओळख नसणार्‍या बालकांना अक्षरओळख करुन देत त्यांना सुसंस्कृत मनुष्य घडविण्याचा पेशा पत्करलेल्या शिक्षकाकडून खरोखर जाणुनबुजुन चुक होईल का? नकळत मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याशी मतभेद झाले म्हणून शिक्षकांचे निलंबन करणे कितपत योग्य आहे? येरेकर आणि भास्कर पाटील यांनी आतापर्यत चाळीसच्या आसपास शिक्षकांचे किरकोळ कारणावरुन निलंबन केलेले आहे. जर आपण इतके कर्तव्यदक्ष अधिकारी आहात तर बहुजन महिला शिक्षिकेचा विनयभंग किंवा छेडछाड करणारा भास्कर पाटील, संभाजी भदगलेवर प्रशासकीय निलंबनाची कारवाई करण्यास हात का धजावत नसावा? शिक्षण विभागातील मलिदा लाटण्यास दोघांचे असलेले संगनमत याला आडवे येत असावे अशी शिक्षक आणि नागरिकांत कुजबुज सुरू आहे.
शिक्षक निलंबनाचे चाललेले षडयंत्र बघुन शिक्षक पुरते धास्तावले असल्यामुळे बळकट असलेली शिक्षक संघटनेच्या नेत्यांनीही त्यांच्यापुढे नांगी टाकली की काय? असा सवाल उपस्थित होतो. जो कुणी पुढे येऊन अन्यायाचा पाढा वाचण्याचा प्रयत्न करेल त्याचे काही तासात निलंबन करण्याचा अघोरी प्रकार सध्या जिल्हा परिषदेत सुरु आहे. भास्कर पाटील, भदगलेवर गुन्हा दाखल होऊनही निलंबनाची कारवाई करण्याची हिंमत येरेकर दाखवणार नसेल तर आजपर्यंत निलंबित झालेल्या सर्व शिक्षकांच्या कारवाया रद्द करण्याचा मोठेपणा तरी येरेकरांनी दाखवावा. जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा कारभार बघणारा अधिकारी चारित्र्यसंपन्न, सज्जन असायला हवा. मात्र भास्कर पाटील किती चारित्र्यसंपन्न आहे हे सांगायला ज्योतीषाची गरज नाही. जिथे जाईल तिथे गुन्हा हे समीकरण होऊन बसले आहे. गुन्हा दाखल झाला म्हणजे चार पाच दिवस फोन बंद ठेऊन फरार व्हायचे आणि जामीन मिळाला की मोठ्या दिमाखात कार्यालयात येऊन पुन्हा तेच पाढे गिरवण्यास सज्ज. जिल्हा परिषदेत प्रशासकराज आल्यापासून यांना विचारण्यास कुणी धनी नसल्यामुळे सध्या जिल्हा परिषदेत मनमानी कारभारामुळे यांची मस्ती चांगलीच वाढीस लागली आहे. विनाकारण निलंबन झालेल्या शिक्षकांच्या भावना त्यांच्या कुटूंबाची अवस्था लक्षात येण्यासाठी पाटील आणि भदगलेंचे निलंबन होणे गरजेचे आहे. तशी निलंबन प्रक्रियेची प्रचिती त्यांच्या लक्षात येणार नाही.

लोकमंथनच्या भूमिकेचे स्वागत
अहमदनगर जिल्हाभरातून शिक्षकांनी दैनिक लोकमंथनच्या भूमिकेचे स्वागत केले असून प्राथमिक शिक्षण विभागात चाललेल्या अनागोंदी कारभाराचा पाढा शिक्षकांनी आमच्यापुढे वाचण्यास सुरुवात केली आहे. शिक्षणधिकारी भास्कर पाटील आणि भदगले यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला असला तरी गुन्हेगारांचे निलंबन होईपर्यंत दैनिक लोकमंथन पाठपुरावा करत राहिल आणि पीडित शिक्षकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत.

COMMENTS