Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृत्रिम पावसाच्या प्रयत्नात, दुब‌ईत ढगफुटीने महापूर!

गेल्या काही वर्षापासून जगभरात वातावरणात बदल होत असल्याच्या वार्ता आपण सारख्या ऐकत असतो; परंतु, गेल्या वर्षा-दोन वर्षापासून आपण जगाच्या अनेक देशां

आगामी काळ अर्थव्यवस्थेसाठी अधिक कठीण : डॉ. मनमोहन सिंग
चीनकडून तैवानला घेरण्याचा प्रयत्न
देशमुखांवरील आरोपांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी ; राज्य सरकार निर्णयाप्रत

गेल्या काही वर्षापासून जगभरात वातावरणात बदल होत असल्याच्या वार्ता आपण सारख्या ऐकत असतो; परंतु, गेल्या वर्षा-दोन वर्षापासून आपण जगाच्या अनेक देशांमध्ये महापूर आल्याची परिस्थिती पाहत आहोत. एकंदरीत हे निसर्गाच्या हवामान बदलांमध्ये होणाऱ्या परिस्थितीतून उद्भवणारी बाब असल्याचे म्हटले गेले आहे. परंतु, काल दुबईत जो महापूर आला, अवघ्या दीड तासात संपूर्ण शहरात पाणी तुंबून, शॉपिंग मॉल पाण्याने तुडूंब भरले आणि रस्त्यावरच्या गाड्या पाण्यात तरंगू लागल्या. एकाएकी दुबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस कसा झाला? तर त्याचे कारण दुबईमध्ये कृत्रिमरित्या हा पाऊस पाडण्यात आला. दुबईतले तापमान जवळपास ५० सेल्स डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढले असल्याने, जमिनीतील पाण्याचा स्तर अधिक खालावतो आहे. यामुळे पाण्याची टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. दुबई हा वाळवंटी प्रदेश असल्यामुळे पाण्याची पातळी कमी आहेच; परंतु उन्हाचे तापमान डिग्री सेल्सिअस जेव्हा वाढते, तेव्हा, जमिनीत असलेल्या पाण्याची पातळी खाली जाते. यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी कृत्रिमरित्या पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला; ज्यामध्ये ढगांवर सिल्वर आयोडाइड नावाचं एक केमिकल शिंपडून, हा पाऊस पाडण्यात आला. दुबईमध्ये साधारणत: दीड वर्षांमध्ये जेवढा पाऊस पडतो, तितका पाऊस या कृत्रिम पद्धतीने दुबईत पाडण्यात आला. अवघ्या दीड तासाच्या पावसात दुबईत १०० मिलिमीटर पाऊस पडला आणि दुबई महापुराने घेरली गेली. अर्थात कृत्रिम पाऊस यापूर्वी चीनमध्ये देखील २००८ या वर्षी पाडण्यात आला होता. त्यावेळी चीनमध्ये ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बीजिंग शहरांमध्ये बांधल्या गेलेल्या “बर्ड नेस्ट” या स्टेडियम मध्ये पाऊस पडू नये, याची खबरदारी घेण्यासाठी बीजिंग शहराच्या बाहेरच कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न झाला. ऑलिंपिक गेम सुरक्षित राहिले. तीच मेथड यावेळी दुबईमध्ये वापरण्यात आली. परंतु शास्त्रज्ञांना जेवढा अंदाज होता, त्याच्या पलीकडे सिल्वर आयोडाइड शिंपडण्याचा परिणाम ढगांवर झाला. पाऊस वेगाने येण्याऐवजी अक्षरशः ढगफुटी झाली. अवघे दुबई शहर हे महापुराने वेढले गेले. अर्थात, दुबईमध्ये पाऊस फार कमी पडत असल्यामुळे दुबईकरांना ही सर्व परिस्थिती अनोळखी आणि अतिशय नवीन राहिली. त्यामुळे तात्काळ यावर उपाययोजना करण्याच्या बाबी देखील त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात असतीलच, याची काही खात्री देता येत नाही. वाळवंटी प्रदेश असणाऱ्या दुबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होईल, याची शक्यता कोणालाही नसल्यामुळे, अशा प्रकारची महापूराची परिस्थिती दुबई शहरात निर्माण होईल. याची साधी कल्पना देखील कोणी केली नसेल. दुबई शहरात कृत्रिमरीत्या पाडला गेलेला पाऊस गेल्या ७५ वर्षात दुबईमध्ये झालेला सर्वाधिक पाऊस म्हणून त्याची नोंद झाली आहे. अर्थात, ज्या पद्धतीने कृत्रिम पाऊस पाडण्याची योजना आखण्यात आली होती, त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हा पाऊस येईल याचा साधा अंदाजही गृहीत धरला नव्हता. ढगांवर सिल्वर आयोडाइड फवारल्यामुळे, त्या ढगांपासून पाऊस येण्याऐवजी त्यात ढगफुटीची परिस्थिती निर्माण झाली. दुबई शहर पाण्यामध्ये बुडाले, अर्थात अशा प्रकारचा पाऊस मानवी जीवन आणि वनस्पती, झाडे यांच्या अस्तित्वासाठी देखील धोकाच आढळतो. त्यामुळे अशा प्रकारचा पाऊस वारंवार पाडता येत नाही. एवढ्या प्रमाणात तर तो करता येत नाही. परंतु, शास्त्रज्ञांचाही या संदर्भातला अंदाज चुकला आणि ढगांवर जी फवारणी करायची होती, ती अपेक्षेपेक्षा अधिक झाल्याने किंबहुना एका प्रमाणापेक्षा अधिक झाल्याने, ही ढगफुटी झाली. दुबईचे जनजीवन वस्कळीत झाले. महापुराची शक्यता असणाऱ्या शहरांमध्ये पाण्याच्या निचरा करण्याची व्यवस्था आधीच विराजमान असते; परंतु, दुबई सारख्या शहरांमध्ये अशा प्रकारची कोणतीही शक्यता नसल्याने, पाण्याचा निचरा करण्यासाठी ती परिस्थिती असेलच, असे नाही! त्यामुळे अधिक काळ दुबईच्या रस्त्यांवर पाण्याचा महापूर अक्षरशः तुंबून होता.

COMMENTS