Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावात पहाट पाडवा भक्ती गीतांचा कार्यक्रम उत्साहात

कोपरगाव तालुका ः श्री साईगांव पालखी सोहळा, मुंबादेवी तरुण मंडळ, ज्येष्ठ नागरिक सेवा मंच, ज्येष्ठ महिला समिती, शारदा संगीत विद्यालय यांच्या संयुक्

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
समताच्या शिबिरात 73 रक्तदात्यांनी केले रक्तदान
कोतवाली पोलिसांनी तीन लाखांचे मोबाईल तक्रारदारांना केले परत. 

कोपरगाव तालुका ः श्री साईगांव पालखी सोहळा, मुंबादेवी तरुण मंडळ, ज्येष्ठ नागरिक सेवा मंच, ज्येष्ठ महिला समिती, शारदा संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्षानिमित्त, पहाट पाडवा हा भक्ती गीत लोकगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
याप्रसंगी पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, पतसंस्था फेडरेशनचे काकासाहेब कोयटे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सौ पुष्पाताई काळे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे, महिला मोटार उपाधिक्षक माधवी वाघ, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब, उत्तम भाई शहा, डॉ. विलास आचारी, जवाहरलाल शहा, ह.भ.प. जगन्नाथ महाराज थोरे, रजनी गुजराथी, शैलजा  रोहोम, नितीन डोंगरे, शहरातील डॉक्टर, वकील, व्यापारी, संगीत प्रेमी नागरिक, महिला, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक विजय बंब यांनी केले. ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. विलास आचारी यांनी आभार प्रदर्शन केले. पहाट पाडवा समारंभासाठी मंडळाचे सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.

COMMENTS