उद्यापासून कोपरगाव शहरातील सर्व व्यवहार  होणार सुरू-नगराध्यक्ष वहाडणे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

उद्यापासून कोपरगाव शहरातील सर्व व्यवहार होणार सुरू-नगराध्यक्ष वहाडणे

येत्या ११ जून पासून कोपरगाव शहरातील सर्व व्यवहार रविवार वगळता सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली.

पंढरीच्या वारीला लाभली तीनशे वर्षांची अखंड पायी दिंडीची परंपरा  
जप्त ट्रॅक्टर सोडण्यासाठी अडवणूक, देहर्‍याच्या युवकाने केली आत्महत्या
Kopargoan : आमदार आशुतोष काळेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा l LokNews24

कोपरगाव शहर प्रतिनिधी : येत्या ११ जून पासून कोपरगाव शहरातील सर्व व्यवहार रविवार वगळता सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली.
 या वेळी  वहाडणे यांनी सांगितले की, कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी संघटनेचे प्रतिनिधींची मिटिंग नगराध्यक्ष दालनात नुकतीच पार पडली. यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी करायच्या उपाययोजनांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली.यावेळी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,      उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे उपस्थित. या बैठकीत शुक्रवार दि.११ जून पासून शहरातील सर्व व्यवहार सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू रहाणार आहेत. तसेच “दर रविवारी” १००% जनता संचारबंदी असणार आहे.  रविवार वगळता फक्त हॉटेल-रेस्टॉरंट-खानावळ रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील.
प्रत्येकाने मास्कचा व्यवस्थित वापर करावा,सुरक्षित अंतर ठेवावे,विनाकारण रस्त्यावर फिरू नये-गर्दि करू नये. सर्वांनी प्रशासनास सहकार्य केले तरच आपण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकतो याचे भान ठेवणे गरजेचे आहे.प्रशासनास कठोर कारवाई करण्याची वेळ आणू नये ही नम्र विनंती वहाडणे यांनी केली आहे.

COMMENTS