Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ तनपुरे कारखान्याच्या कामगारांचा पगारासाठी एल्गार

15 एप्रिलला होणार्‍या महामेळाव्यात ठरवणार आंदोलनाची दिशा

राहुरी  ः राहुरी फॅक्टरी येथे येत्या 15 एप्रिल रोजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा महामेळावा घेणार आहे. त्यात थकित वेतन व इतर कोट्या

पुणतांबा ग्रामपंचायतीसाठी तिरंगी लढत
शिक्षकांच्या बदलीसाठी होणार सोमवारपासून प्रोफाईल अपडेट
LokNews24 l ‘टीव्हीपेक्षा तेज’ सट्टेबाजी करणाऱ्या 33 बुकींना अटक

राहुरी  ः राहुरी फॅक्टरी येथे येत्या 15 एप्रिल रोजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा महामेळावा घेणार आहे. त्यात थकित वेतन व इतर कोट्यावधींच्या थकबाकीवर चर्चा होईल. आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असा इशारा राष्ट्रीय साखर कामगार युनियनतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आला.
राहुरी फॅक्टरी येथे गुरूवारी राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे, उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग, सचिव सचिन काळे, कामगार नेते इंद्रभान पेरणे, युनियनचे सदस्य सिताराम नालकर, ईश्‍वर दुधे, बाळासाहेब तारडे, रावसाहेब ढूस, रामभाऊ ढोकणे, राजेंद्र गागरे, नामदेव शिंदे, सुनील म्हसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपाध्यक्ष दुशिंग म्हणाले, राहुरी फॅक्टरी येथे येत्या 15 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या प्रांगणात कामगारांचा महामेळावा आयोजित केला आहे. कामगारांनी थकीत वेतनासाठी तीन वेळा आंदोलने केली. आम्ही भीक मागत नाही. आमच्या कष्टाचे थकीत वेतन मागत आहे. कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. युनियनचे सचिव काळे म्हणाले, जिल्हा बँकेतर्फे कारखाना जप्तीची कारवाई पूर्वनियोजित कट आहे. कामगारांना वार्‍यावर सोडले आहे. महामेळाव्यापूर्वी कामगारांची थकबाकी द्यावी. अन्यथा, कामगारांनी विरोधात भूमिका घेतल्यास आगामी निवडणुकीत मतदार संघात फिरून अन्यायाचा पाढा वाचला जाईल. असेही काळे यांनी सांगितले. युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे यांनी आभार मानले.

COMMENTS