Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भीमा कोरेगाव प्रकरणातील शोभा सेन यांना जामीन

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आणि नागपूर विद्यापीठातील माजी प्राध्यापिका शोमा सेन यांचा जामीन काही अटींसह

शिर्डीत राम नवमी निमीत्त विविध कार्यक्रमांचे आयेजन 
५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय संसदेने का घेतला नाही? भुजबळांचा सवाल
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी फोडाफोडीला सुरुवात… भाजपचा नेता करणार शिवसेनेत प्रवेश…

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आणि नागपूर विद्यापीठातील माजी प्राध्यापिका शोमा सेन यांचा जामीन काही अटींसह मंजूर केला आहे. नक्षलवादांशी संबंध असल्याचा आरोप करत त्यांना बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायदा (युएपीए) अंतर्गत अटक करण्यात आली होती.
न्या.अनिरुद्ध बोस आणि न्या.ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. शोमा सेन यांना 6 जून 2018 साली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्या अटकेत आहेत. ‘याप्रकरणी युएपीए कायद्याच्या अंतर्गत जामीन नामंजूर करण्याचे बंधन नाही. याशिवाय सेन यांचे वय वघता तसेच भरपूर कालावधी कारागृहात घातल्यामुळे त्यांना जामीन मिळविण्याचा हक्क आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना नोंदविले. याबाबत नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेन्सीने (एनआयए) 15 मार्च रोजी सेन यांना आणखी काळ ताब्यात ठेवण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने काही अटींसह सेन यांचा जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या परवानगीशिवाय सेन यांना महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जाता येणार नाही. त्यांना त्यांचा पासपोर्ट तपास अधिकार्‍यांकडे जमा करावा लागणार आहे. याशिवाय सेन यांना मोबाईल फोनचे लोकेशन कायम सुरू ठेवून त्याची माहिती तपास अधिकार्‍यांना द्यावी लागणार आहे.

COMMENTS