Homeताज्या बातम्यादेश

आठ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश

लोकसभा निवडणुकीपूर्वी पोलिस यंत्रणेकडून शोधमोहीम

गडचिरोली ः गडचिरोलीतील कोरचोली येथे झालेल्या चकमकीत आतापर्यंत आठ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले असून, दुसरीकडे बिजापूर येथ

पोल्ट्री धारकांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवू
 अनैतिक संबंधातून माय लेकीवर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न       
ठाकरेंचे मशाल चिन्ह देखील धोक्यात

गडचिरोली ः गडचिरोलीतील कोरचोली येथे झालेल्या चकमकीत आतापर्यंत आठ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले असून, दुसरीकडे बिजापूर येथे देखील पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे. बिजापूर येथे देखील 4 नक्षलवाद्यांना ठार केल्याचे म्हटले जात आहे, मात्र याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नक्षलवादी मोठा घातपात करण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजेपासून नक्षलवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू होती. या कारवाईत आठ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच या चकमकीत अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आगामी काळात होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस दलाला मोठे यश मिळाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरचोली भागात आज सकाळपासूनच नक्षलवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये चकमक सुरू होती या चकमकेमध्ये आठ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठा कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणा यशस्वी झाल्या असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र मध्ये आगामी काळात लोकसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुका राज्यात पाच टप्प्यात होणार असून यामध्ये 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे असे पाच दिवशी मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी किंवा दरम्यानच्या काळात नक्षलवाद्यांकडून मोठा घातपात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आधीच सतर्क झाली होती. या सुरक्षा यंत्रणेला आता मोठे यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पोलीस नक्षलवादाचे कंबरडे मोडण्यात व्यस्त आहेत. बालाघाटचे एसपी समीर सौरभ यांनी या घटनेला दुजोरा देत दोन नक्षलवादी ठार झाल्याचे सांगितले. यामध्ये नक्षलवादी नेता डीव्हीसीएम सजंती उर्फ क्रांती 29 लाखांचे बक्षीस आणि नक्षलवादी रघु उर्फ शेर सिंग एसीएम याच्यावर 14 लाखांचे बक्षीस आहे. पोलिसांनी मंगळवारी सकाळी दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनीही परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

घातपात उधळण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र – गडचिरोली पोलिसांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नक्षल विरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी त्यांची रणनीती असल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलीस आणि जवानांनी नक्षलविरोधी सर्च ऑपरेशन सुरु केले. त्याचपार्श्‍वभूमीवर पोलिस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांची शोधमोहीम राबवत त्यांचा खात्मा करण्यात यश मिळवले आहे.

COMMENTS