Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पशुहत्येस विरोध केल्याने मढी देवस्थानच्या कर्मचार्‍यांना मारहाण

पाथर्डी ः मंदिर परिसरात पशुहत्या करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून मढी देवस्थानच्या चार कर्मचार्‍यांना आज अज्ञात चार ते पाच इसमांनी मारहाण करण्य

कर्जाचा डोंगर वाढल्याने शेतकऱ्याने संपवीली जीवनयात्रा
वसुंधरेचे संरक्षण नागरिकांचे कर्तव्य : डॉ. सिद्दिकी
अहमदनगर जिल्ह्यात नव्या ३७८० बाधितांची रुग्ण संख्येत भर

पाथर्डी ः मंदिर परिसरात पशुहत्या करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून मढी देवस्थानच्या चार कर्मचार्‍यांना आज अज्ञात चार ते पाच इसमांनी मारहाण करण्याची घटना मढी येथे घडली आहे.या वेळी झालेल्या मारहाणीच्या वेळी जोरदार दगडफेक झाली असून एका चारचाकी वाहनाच्या काचा सुद्धा फोडण्यात आल्या. देवस्थानचे कर्मचारी अभिषेक बाळासाहेब मरकड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चार ते पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मढी देवस्थानने तीन वर्षांपूर्वी कानिफनाथ मंदिर परिसरात पशुहत्या करण्यास बंदी घातली होती.या निर्णयावरून पूर्वी वादही झाले होते.चालू वर्षी सुद्धा मंदिर परिसरात पशुहत्या करू नका असे आवाहन देवस्थान चे अध्यक्ष संजय मरकड यांनी केले होते तर पशुहत्या विरोधी पथक सुद्धा तैनात करण्यात आले होते. या पार्शवभूमीवर फिर्यादी अभिषेक मरकड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे कि मी, देवस्थानचे अध्यक्ष मरकड, दत्तात्रय वसंत मरकड, राहुल अशोक कुटे हे सोबत असताना आम्हाला दत्तू पाखरे यांच्या शेतात गर्दी दिसल्याने आम्ही पाखरे यांच्या शेतात गेले असताना त्या ठिकाणी काही अज्ञात इसम उभे होते व त्यांनी एक बोकड कापण्यासाठी आणला होता.त्यांना या ठिकाणी पशुहत्या करू नका असे आम्ही सांगितले असता त्यांनी आम्ही नवस केला असून आम्ही बोकड कापणारच असे सांगत मला चाकूने मारहाण केली तर इतरांनी माझ्या समवेत असलेल्या जगदीश धाडगे, राहुल कुटे, प्रवीण ढवळे यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.  

COMMENTS