नवी दिल्ली ः भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ’भारतरत्न’ पुरस्कार प्रदान केला.
नवी दिल्ली ः भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ’भारतरत्न’ पुरस्कार प्रदान केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वत: अडवाणी यांच्या घरी जाऊन पुरस्कार दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपस्थित होते. लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत ठीक नसल्यामुळे शनिवारी आयोजित केलेल्या राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लालकृष्ण अडवाणी यांना घरी जाऊन भारतरत्न पुरस्कार प्रदान केला.
राष्ट्रपतींनी शनिवारी राष्ट्रपती भवनात 4 व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि डॉ. एमएस स्वामीनाथन यांच्या नावाचा सामावेश आहे. राष्ट्रपती भवनात या व्यक्तींच्या नातेवाईकांना भारतरत्न पुरस्कार स्वीकारला. यावेळी पी.व्ही. नरसिंह राव यांचे पूत्र पीव्ही प्रभाकर राव, चौधरी चरण सिंह यांचे नातू जयंत चौधरी, कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर आणि एमएस स्वामीनाथन यांची कन्या नित्या राव या हजर होत्या. लालकृष्ण अडवाणी हे फेब्रुवारीत भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते, मी अत्यंत विनम्र आणि कृतज्ञापूर्वक भारतरत्नाचा स्वीकार करतो. एक व्यक्ती म्हणून हा पुरस्कार हा अभिमानाची बाब आहे. खरंतर माझे आदर्श आणि सिद्धांताचा सन्मान केला आहे. मी संपूर्ण आयुष्यभर सेवा प्रयत्न केला आहे. मी कुटुंबातील सदस्य, दिवंगत पत्नी कमला विषयी भावना व्यक्त करतो. माझ्या जीवनात शक्ती आणि स्थैर्य हा सर्वात मोठा स्त्रोत आहे. यावेळी अडवाणी यांनी राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते.
COMMENTS