मुंबई ः काँगे्रसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त
मुंबई ः काँगे्रसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले असून, त्या आज शनिवारी अधिकृरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र अशी ओळख असणारे माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी देखील नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता मराठवाड्यातील काँग्रेस जवळपास संपुष्टात येते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवराज पाटील चाकूरकर हे माजी केंद्रीय मंत्री असून ते लोकसभेचे अध्यक्ष देखील होते. तसेच काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यपाल पदाची जबाबदारी देखील दिली होती. मात्र, असे असताना त्यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या शनिवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. डॉ. अर्चना चाकूरकर यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईमधील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अर्चना पाटील चाकूरकर यांचा भाजप प्रवेश होणार आहे. चाकूरकर कुटुंबीयातून या संदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. लातूर लोकसभा मतदारसंघ आणि जिल्हा या दोन्हीमध्ये चाकूरकर कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. आता चाकूरकर परिवार भाजपसोबत केल्यानंतर मराठवाड्यामध्ये केवळ विलासराव देशमुख यांचे पुत्र काँग्रेस सोबत राहणार, असेच चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
COMMENTS