पुणे ः एका कंपनीच्या स्कायरिम कॅपिटल नावाच्या अॅपमध्ये स्टॉक गुंतवणूक केल्यास 300 टक्के परतावा देण्यात येईल असे अमिष दाखवून एका तरुणाची तब्बल 35
पुणे ः एका कंपनीच्या स्कायरिम कॅपिटल नावाच्या अॅपमध्ये स्टॉक गुंतवणूक केल्यास 300 टक्के परतावा देण्यात येईल असे अमिष दाखवून एका तरुणाची तब्बल 35 लाखांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत हतेशभाई घनशामभाई चौहान (वय-28,रा. मोशी, पुणे) या तरुणाने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा प्रकार 15 जानेवारी 2023 ते 5 फेबु्रवारी 2024 यादरम्यान घडला आहे. याबाबत आग्नेश, अन्या रेड्डी, स्कायरिम कॅपीटल एक्झीकेटिव्ह अशा विविध अनोळखी 4 मोबाइल धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे त्यांच्या राहते घरी असताना आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन करुन ‘टीचर सिंग फॅन एक्सचेंज ग्रुप सी 999’ या व्हॉट्सअप ग्रुप व स्कायरिम कॅपीटल 903 व्हॉटसअप ग्रुप मध्ये सहभागी झाल्यावर, स्कायरिम कॅपीटल नावाच्या अॅप मध्ये स्टॉक गुंतवणूक केल्यास 300 टक्के जास्त परतावा मिळेल असे प्रलोभन दाखवले. तक्रारदार यांच्या एचडीएफसी बँक शाखा, सानंद अहमदाबाद गुजरात खाते व अॅक्सीस बँक शाखा अहमदाबाद खातेवरुन त्यांनी आरोपींच्या वेगवेगळ्या खात्यावर एकूण 25 लाख 55 हजार रुपये रक्कम आरटीजीएस व नेटबँकिंग द्वारे टाकली. त्या बदल्यात तक्रारदार यांना अॅपवर 50 हजार इतकी रक्कम परताव्यासह येणे बाकी दाखवले होते. परंतु त्यापैकी तक्रारदार यांना आरोपींनी केवळ 50 हजार रुपये परत दिले. उर्वरित 25 लाख 5 हजार रुपये व त्यावरील परतावा 10 लाख रुपये असे एकूण 35 लाख 5 हजार रुपये न देता सदर रकमेची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस पठारे करत आहेत.
COMMENTS