Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. एम. एस. हरणे यांना भारत सरकारचे पेटंट बहाल

संगमनेर ः अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यंत्रअभियांत्रिकी या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक व महाविद्यालयीन परिक्षा अधिकारी या पदावर कार्यरत अस

श्रीपाद छिंदमकडून टपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण l LokNews24
शालेय स्वयंपाकी व मदतनीसांना दारिद्रय रेषेचे कार्ड द्या ः महेंद्र विधाते
पत्रकारितेतील योगदानाबद्दल चंदन घोडके यांना भीमरत्न पुरस्कार

संगमनेर ः अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यंत्रअभियांत्रिकी या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक व महाविद्यालयीन परिक्षा अधिकारी या पदावर कार्यरत असलेले डॉ. एम. एस. हरणे यांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयातुन उेपींळर्र्पीेीी झरीीर्ळींश चेींळेप चरलहळपश (उझच्) या संशोधनास पेटंट बहाल करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली आहे.
       आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिजिओथेरपीस्ट वेगवेगळ्या उपचार पध्दतींचा वापर करतात. यात प्रामुख्याने व्यायाम, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा समावेश असतो. सांधेरोपण शस्त्रक्रियेनंतर सांध्यांमध्ये पुरेशी ताकद नसते, ती वाढवण्यासाठी व स्नायु बळकट करण्यासाठी विविध यंत्रांचा वापर करावा लागतो. प्रत्यारोपन केल्यानंतर रुग्णाच्या दैनंदिन हालचाली सुलभ होण्यास उपकरणांचा वापर खुप फायदेशीर ठरते, परंतु ते खुप महाग व खर्चिक असल्यामुळे सर्वसामान्य रुग्नांना परवडणारे नाही. त्यानुसारच डॉ. हरणे यांनी उझच् या मशिनवर संशोधन केले आहे. या संशोधनामुळे एक अत्याधुनिक व सर्व सांध्यांना वापरता येईल असे व कमी खर्चात सदरचे यंत्र तयार करण्यात आले आहे. सदरचे संशोधन हे मेकॅनिकल क्षेत्रातील एक अत्यंत मोलाचे संशोधन असून या यंत्राचा वापर करुन अनेक रुग्नांच्या सर्व सांध्यांची कार्यक्षता वाढवण्यास मदत होणार आहे. डॉ. एस. व्ही. देशमुख (प्राध्यापक, बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, वर्धा) यांचाही इन्व्हेंटर रुपाने या संशोधनात मोलाचा वाटा आहे. शैक्षणिक योगदानासाठी व संशोधनासाठी निरंतर प्रयत्नशील असलेले प्रा. डॉ. एम. एस. हरणे यांचे काम हे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्‍वास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी व्यक्त केला. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी महसुल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, विश्‍वस्त डॉ. सुधीरजी तांबे, सौ. शरयुताई देशमुख,  इंद्रजितभाऊ थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे, यंत्रअभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. व्ही. डी. वाकचौरे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा. डॉ. एम. एस. हरणे यांचे अभिनंदन केले.

COMMENTS