Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदर्श विद्यामंदिर सोनईत विविध स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषक वितरण                        

सोनई ः हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पानसवाडी संचलित आदर्श विद्यामंदिर सोनई येथील माध्यमिक विद्यालयात 2023-24 मध्ये पार पडलेल्या विविध स्पर्

संजीवनी अभियांत्रिकीच्या 60 विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये निवड
आरोग्य सेवेने मनुष्य जगवून, माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम आनंदऋषीजी हॉस्पिटलने केले -आयुक्त डॉ. पंकज जावळे
नाशिक शहरातील स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या कामांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी

सोनई ः हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पानसवाडी संचलित आदर्श विद्यामंदिर सोनई येथील माध्यमिक विद्यालयात 2023-24 मध्ये पार पडलेल्या विविध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ 27 मार्च रोजी सोनई येथील आदर्श विद्या मंदिर येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला जय हनुमान ग्रामीण विकास संशोधन मंडळाचे सचिव रवी दादा गडाख व पानसवाडी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच लक्ष्मीबाई तुकारामजी गडाख तर पारितोषिक वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रतीक ज्ञानेश्‍वर फोपसे सेल टॅक्स इन्स्पेक्टर तसेच आदर्श विद्यालय स्कूल कमिटीचे अध्यक्ष अरुणराव चांदघोडे तसेच आदर्श विद्यालयाचे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब खेसमाळस्कर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अनिल दरंदले उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये विजय मिळविला होता त्यांचा आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व ज्ञानेश्‍वर फोपसे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले यावेळी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर पालक व विद्यार्थी उपस्थित होते. वर्षभरामध्ये विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी यश संपादन केले व शाळेचे नाव पुढे नेले त्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यावेळी पालकांबरोबर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS