Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंद केलेले पाणी टँकर पुन्हा चालू करा

महिला व नागरिकांचा जामखेड तहसीलवर हंडा मोर्चा

जामखेड ः सध्या जामखेड तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तांत्रिक बाबींचे कारण सांगत प्रशासनाकडून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या

वाईन निर्णयाविरोधात नगरने दाखल केली जनहित याचिका
मनरेगाकडून 2.30 कोटी निधी मंजूर ः आ. आशुतोष काळे
नेवाशात विठ्ठल रुख्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

जामखेड ः सध्या जामखेड तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तांत्रिक बाबींचे कारण सांगत प्रशासनाकडून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने चालू असलेले पाणी टॅकर बंद केले. हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा पुन्हा टँकर चालू करण्याच्या मागणीसाठी 27 मार्च रोजी जामखेड तालुक्यातील विविध गावांच्या महिलांनी हंडा व अक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढला होता.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिला वृध्द शालेय मुलं नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. नागरिकांची पाण्याची गरज ओळखून जामखेड कर्जत एकात्मिक संस्थेच्या वतीने घरोघरी टँकरने मोफत पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु काही कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचे कारण सांगत प्रशासनाकडून सध्या हे टँकर बंद करण्यात आले आहेत. पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. दुसरीकडे अद्यापही शासकीय टँकर सुरू झालेले नाहीत. मागील पाच वर्षांपासून कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेमार्फत लोकांच्या मागणीनुसार आम्हाला पाणीपुरवठा केला गेला. परंतु सध्या प्रशासनाकडून हे टँकर बंद करण्यात आल्याने लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. टँकर पुन्हा सुरु न झाल्यास लोकांमधील संतापाची तीव्रता अधिक वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे शासनास सहाय्यभूत ठरणार्‍या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माधयमातून टँकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करणे याबाबत आपल्या स्तरावरून सूचना देऊन प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला पाणीपुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि शेतकरी यांच्या योग्य समन्वयामुळं यंदा प्रथमच तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींचे सर्वाधिक प्रस्ताव मंजूर झाले. परंतु राजकीय दबावाला बळी पडून मंजूर झालेल्या विहिरींच्या या प्रस्तावांच्या चौकशीची भीती दाखवून विहिरींचा विषय मुद्दाम रेंगाळत ठेवण्याचा आणि सामान्य शेतकर्‍यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला. विशिष्ट लोकांच्या राजकारणासाठी प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने येणार्‍या राजकीय दबावाला बळी पडून नागरिकांच्या हितासोबत असा खेळ खेळणे योग्य नाही, याचीही प्रशासनाने गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी. ही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, प्रा राजेंद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, मोहन पवार, दीपक पवार पाटील, शहाजी राळेभात, काकासाहेब कोल्हे, शहराध्यक्ष वशिम शेख, सागर कोल्हे, दत्तात्रय सोले पाटील, बापूसाहेब कार्ले, राजू गोरे, प्रकाश काळे, प्रदिप धुमाळ,विश्‍वनाथ राऊत, सुभाष माने, हरिभाऊ आजबे, नितीन ससाने, सुधीर राळेभात, पाटील, प्रशांत राळेभात पाटील, सिद्धेश्‍वर लटके, अजिनाथ कुमटकर, मोहन भोसले, रामहरी गोपाळघरे, गणेश म्हस्के, बाळासाहेब खैरे, अशोक पठाडे, भाऊ कसरे, श्रीकांत लोखंडे महालिंग कोरे,तसेच शेकडो महीला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

COMMENTS