Homeताज्या बातम्यादेश

छत्तीसगडमध्ये 6 नक्षलवाद्यांचा खात्मा

रांची ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नक्षलवादाने प्रभावित जिल्ह्यात सुरक्षा दल दक्ष असून बुधवारी छत्तीसगडमधील विजापूरमध्ये सुरक्षादलाचे जवा

जमिनीच्या वादातून तलवारीने तोडले हात पाय| LOKNews24
काँगे्रसमध्ये पुन्हा दुफळीचे संकेत
जनतेमधून सरपंच निवड प्रक्रिया पुन्हा राबवावी : जय हिंद फाउंडेशनची मागणी

रांची ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नक्षलवादाने प्रभावित जिल्ह्यात सुरक्षा दल दक्ष असून बुधवारी छत्तीसगडमधील विजापूरमध्ये सुरक्षादलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली असून या चकमकीत जवानांनी केलेल्या गोळीबारात 6 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे.
याबाबत एसपी जितेंद्र कुमार यादव यांनी माहिती दिली आहे. छत्तीसगडमधील बिजापूर येथील बासागुडा पोलिस स्टेशन परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. कोब्रा 210, 205, सीआरपीएफची 229 वी बटालियन आणि डीआरजी यांचा समावेश असलेल्या सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. जवानांनी जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांना घेरुन जोरदार गोळीबार केला. जवानांनी केलेल्या गोळीबारात 6 नक्षलवादी ठार झाले. या चकमकीनंतर बासागुडाच्या जंगलात शोध घेत असताना जवानांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. होळीच्या दिवशी या भागात नक्षलवाद्यांनी 3 ग्रामस्थांची हत्या केली होती. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा भागात होळीच्या दिवशी तीन गावकर्‍यांवर अज्ञातांनी कुर्‍हाडीने वार करून त्यांची हत्या केली होती. या हत्याकांडामागे नक्षलवादी असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. दुपारी गावात घुसल्यानंतर तिघांवर अज्ञातांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी दोन ग्रामस्थांचा जागीच मृत्यू झाला. एका गावकर्‍याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी या गावकर्‍यांवर एकामागून एक कुर्‍हाडीने अनेक वेळा हल्ला केला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे चंद्रया मोदियम, अशोक भंडारी आणि करम रमेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS