Homeताज्या बातम्यासंपादकीय

ओबीसी तरूणांना प्रशिक्षित करू !

ओबीसी राजकीय आघाडी, रिपब्लिकन  बहुजन सेना, दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल, संघर्ष सेना, बारा बलुतेदार महासंघ यांच्या युतीच्या लोकसभेच्या 30 उमेद

सुमार दर्जाचा ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या लायकीचा कसा ?
संसदेतील गतिरोध संपवा ! 
महाराष्ट्र अशांत करू नका! 

ओबीसी राजकीय आघाडी, रिपब्लिकन  बहुजन सेना, दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल, संघर्ष सेना, बारा बलुतेदार महासंघ यांच्या युतीच्या लोकसभेच्या 30 उमेदवारांची यादी मुंबई मराठी पत्रकार संघात ओबीसी राजकीय आघाडीने घेतलेल्या पत्रकार संघ जाहीर करण्यात आली. यावेळी ओबीसी राजकीय आघाडीचे प्राध्यापक श्रावण देवरे, शंकरराव लिंगे, राजाराम पाटील यांच्यासह अशोकराव सोनवणे म्हणजे आमची स्वतःची उपस्थिती होती. ओबीसी राजकीय आघाडीसोबत आलेल्या पक्षांनी केलेल्या या आघाडीचा आगामी लोकसभा निवडणुकीवर मोठाच परिणाम होईल, यात कोणतीही शंका नाही. ओबीसी राजकीय आघाडीने यापूर्वीच 16 मतदारसंघात आपले उमेदवारांची घोषणा केली होती. आज एकूण 30 उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

आगामी लोकसभा निवडणुका या ओबीसींच्या राजकीय अस्मितेवरच लढवल्या जाणार, यात कोणतीही शंका नाही. महाराष्ट्रात मात्र ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नाने ओबीसी समुदायाची अस्मिता अधिक तीव्र केली आहे, या निवडणुकीत ओबीसी राजकीय आघाडी ही जिंकण्यासाठी लढणार आहे हे आम्ही यापूर्वीच्या या सदरातून सांगितलेल्या आहेत. आम्ही निश्‍चितपणे महाराष्ट्रात पाच जागांवर विजय मिळवणार आहोत हे सूर्यप्रकाशाचे स्पष्ट आहे. कारण या निवडणुकीत ओबीसी हा प्रधान घटक असल्यामुळे आणि त्यांच्यासोबत बहुजन आणि दलित पक्षांची आघाडी झाल्यामुळे या निवडणुकीत ओबीसी राजकीय आघाडी ही मानसिक आणि बौद्धिकरित्या आघाडीवर आहे. निवडणुकीचे निकाल हे नेहमीच मानसिक आणि बौद्धिक आघाडी घेतलेल्या आघाडीच्या किंवा पक्षाचे बाजूूने जातात हा आजपर्यंतचा राजकीय इतिहास आहे. ती उमेदवारांची महाराष्ट्रात घोषणा होणं हे अद्याप पावितो कोणत्याही एका पक्षाला शक्य झाले नाही. अद्याप तरी त्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की, ओबीसी राजकीय आघाडी महाराष्ट्रात नेमकी काय किमया साधत आहे. ओबीसींची राजकीय अस्मिता तीव्र झाली असली तरी प्रत्यक्षात व्यवहारातील राजकीय डावपेच अजूनही ओबीसी समुदायाच्या अंगी बांधलेले नाहीत. त्यामुळे ग्रामीण राजकारणामध्ये तिथल्या प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या विरोधात भूमिका घेणे अजूनही त्यांना शक्य नाही, त्यामुळे वरच्या स्तरावरूनच या भूमिका ग्रामीण भागापर्यंत पोहोचवाव्या लागतील आणि यासाठी तरुण ओबीसी कार्यकर्त्यांची अधिक गरज आहे केवळ तरुण कार्यकर्ते असून चालणार नाहीत तर त्यांच्यामध्ये एक भूमिका घेऊन आत्मविश्‍वासपूर्वक समाजामध्ये जाण्याची एक धैर्य निर्माण करावे लागेल आणि त्यासाठी तरुणांना प्रशिक्षित करावी लागेल तरुणांचे हे प्रशिक्षण निवडणुकीसाठी अल्पकाळात का होईना परंतु त्यांना प्रशिक्षित करावे लागेल आणि त्याशिवाय ओबीसी तरुणांमधला आत्मविश्‍वास जागणार नाही. प्रत्यक्ष फिल्मवर काम करताना धैर्यसाहस आणि आत्मविश्‍वास याची गरज असते आणि ती तरुण ओबीसीमध्ये निर्माण करणे निवडणुकीपूर्वी फार आवश्यक आहे, आणि त्यामुळे ओबीसी राजकीय आघाडी लवकरच हा कार्यक्रम देखील हातात घेईल आणि प्रत्येक मतदारसंघातील काही तरुणांना प्रशिक्षण देऊन या संदर्भात आपला आत्मविश्‍वास आणि धैर्य हे कसे वाढवायचे या संदर्भात मार्गदर्शन होऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाईल म्हणजे कोणत्याही प्रकारे ओबीसी राजकीय आघाडी ही निवडणुका जिंकण्यासाठीच लढेल या तीळ मात्र शंका नाही, त्यामुळे प्रस्थापित राजकीय नेत्यांचे धाबे दणाणल्याशिवाय राहणार नाही यामध्ये आम्हाला कोणतीही शंका नाही.

COMMENTS