Homeताज्या बातम्यादेश

बिहारमध्ये होळी स्पेशल ट्रेनला आग

पाटना - बिहारच्या पाटना येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकमान्य टिळक होळी स्पेशल एक्स्प्रेसच्या एसी डब्याला मंगळवारी (ता. २६) रात्रीच्या अचा

महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही
मुंबईत 24 तासांमध्ये तीन पोलिसांवर हल्ले
रामदास आठवलेंकडून शशी थरुर यांना इंग्रजीचे धडे | LOKNews24

पाटना – बिहारच्या पाटना येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकमान्य टिळक होळी स्पेशल एक्स्प्रेसच्या एसी डब्याला मंगळवारी (ता. २६) रात्रीच्या अचानक भीषण आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. आग लागल्याचं कळताच ट्रेनमधील प्रवासी धास्तावले. त्यांनी धावत्या ट्रेनमधूनच रुळावर उड्या घेतल्या. आगीची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने ट्रेनचा वेग कमी असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत ट्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. दानापूर-पंडित दीनदयाळ उपाध्याय रेल्वे सेक्शनच्या करिसठ स्थानकाजवळ ही घटना घडली. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ट्रेनला लागलेल्या आगीमुळे या मार्गावर इतर ट्रेनवर त्याचा परिणाम झाला. लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं असून प्रवाशांचे हाल होत आहे.

COMMENTS