Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविद्यालयीन युवकांना मतदारदुत बनण्याची संधी 

मतदान जनजागृतीसाठी युवकांची होणार मदत

नाशिक : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अंतर्गत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या सूचनेनुसार मतदार जनजागृतीसाठी नाशिक जिल्ह्यात स्वीप समिती मार्फत वि

शेतपाणंद रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी
ग्रामीण भागातील तरुणीच्या कलेची वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये नोंद
भाजपच्या कटकारस्थानाना बळी पडू नका… हसन मुश्रिफांचं आवाहन

नाशिक : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अंतर्गत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या सूचनेनुसार मतदार जनजागृतीसाठी नाशिक जिल्ह्यात स्वीप समिती मार्फत विविध उप्रकम राबवण्यात येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात मतदान जनजागृतीसाठी स्वीप समितीच्या वतीने आराखडा तयार करण्यात आला असून, या अंतर्गत जिल्ह्यात मतदार जनजगृतीसाठी महाविद्यालयीन युवकांमधुन मतदारदुत यांची निवड केली जाणार आहे. मतदान नोंदणी, मतदार जनजागृती व मतदानावेळी मतदान केंद्रांवर वृद्ध, दिव्यांग व्यक्ती, गरोदर महिला यांना मदत मतदारदूत हे मदत करतील. महाविद्यालयीन युवकांमधून मतदारदुतांची निवड केली जाणार असून यासाठी ऑनलाईन फॉर्मद्वारे ज्या युवकांना मतदारदुत म्हणून काम करावयाचे आहे त्यांनी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

मतदारदुत निवडतांना संबंधित युवकांची राजकीय व गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाणार असून त्यांच्या कृती व कामातून कुठल्याही प्रकारे आचारसंहिता भंग होणार नाही याबद्दल लेखी सूचना देण्यात येऊन त्यानंतरच युवकांना या प्रक्रियेत सहभागी करून घेलते जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये ‘वोटकर नाशिककर – मी ठरवणार माझा खासदार’ अभियान राबवण्यासाठी युवकांची गरज आहे.  मतदानाद्वारे लोकशाहीतील आपला सहभाग दाखवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मतदार जनजागृती करण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदारदूत – हे काम करतील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन देखील स्वीप समितीच्या सह अध्यक्ष आशिमा मित्तल यांनी केले आहे.

COMMENTS