Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँगे्रसच्या शिक्षक विभागाने प्रचारासाठी तयार व्हावे

महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस शिक्षक विभागाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश सोनवणे यांचे आवाहन

सांगली ः लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे काँगे्रस शिक्षक विभागाच्या सर्व शिक्षकांनी आपल्या जिल्ह्यातील पक्षाच्या व आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे सहकार पॅनलचे व्यापारी मतदारसंघातून दोघे उमेदवार विजयी
लातूर जिल्ह्यातील 56 केंद्रांवर 25673 विद्यार्थ्यांनी दिली ‘नीट’ची परीक्षा
जयंत पाटलांच्या अडचणीत वाढ

सांगली ः लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे काँगे्रस शिक्षक विभागाच्या सर्व शिक्षकांनी आपल्या जिल्ह्यातील पक्षाच्या व आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कटिबध्द व्हावे असे आवाहन काँग्रेसच्या शिक्षक विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रा. प्रकाश सोनवणे यांनी उपस्थितांना केले. त्याचे बरोबर लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसाठी मुंबईत आझाद मैदानावर काँग्रेसच्या शिक्षक विभागा तर्फे बेमुदत आंदोलन छेडले जाईल असेही आवाहन त्यांनी केले. सांगली जिल्ह्यात घेतलेल्या बैठकीत सोनवणे बोलत होते.
प्रा. प्रकाश सोनवणे सोमवारी 25 मार्च रोजी सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी दुपारी 3.00 वाजता काँग्रेस कमिटी सांगली कार्यालयात  सांगली जिल्हा शिक्षक विभागाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत  सांगली जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक पासून उच्च शिक्षण शाळा कॉलेज मध्ये कार्यरत अनुदानित, टप्पा अनुदानित व विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे शिक्षण उपसंचालक कोल्हापूर, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि प्राथमिक व माध्यमिक वेतन पथकाकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या प्रलंबित कामाबाबत आढावा घेण्यात आला व  सांगली जिल्हा शिक्षक विभाग अध्यक्ष प्रा.अरविंद जैनापूरे यांनी आपल्या जिल्हा अध्यक्ष नियुक्ती नंतर केलेल्या कामाचा अहवाल सादर केला. या प्रसंगी शिक्षक विभागाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी शिक्षक संबंधित प्रश्‍नाबाबत शिक्षणाधिकारी ,वेतन अधिक्षक व शिक्षण उपसंचालक यांच्याशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करावी व सदर प्रश्‍न सोडवावेत अशी सूचना केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. प्रकाश सोनवणे यांचे जिल्हा शिक्षक विभाग अध्यक्ष प्रा. अरविंद जैनापुरे यांनी यथोचित स्वागत केले. या बैठकीस एन.डी.बिरनाळे प्रा. अरविंद जैनापुरे, वाळवा तालुका अध्यक्ष सत्यजित जाधव, प्रा. पी. बी. पाटील, प्रा. लक्ष्मण मोरे, प्रा. संदीप होरे, प्रदीप जाधव व जिल्ह्यातील इतर शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचारी व सेवादल चे वरिष्ठ नेते अजित ढोले उपस्थित होते.

COMMENTS