श्रीरामपूर ः सेवाभाव ही उच्चतम संस्कृती आहे, या निरपेक्ष वाटेवर प्रवास करणारे विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव विश्वनाथ सुकळ
श्रीरामपूर ः सेवाभाव ही उच्चतम संस्कृती आहे, या निरपेक्ष वाटेवर प्रवास करणारे विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव विश्वनाथ सुकळे हे निःस्वार्थी भावनेने सेवाभाव करणारे एक आदर्श व्यक्तिमत्व असल्याचे गौरवोद्गार देऊळगाव राजा येथील श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. किरण वसंतअप्पा मोगरकर यांनी काढले.
येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांच्या सेवाकार्य, साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक योगदानाबद्दल डॉ. मोगरकर व मित्र मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंदा मोगरकर, सविता मोगरकर, रेखा वाडणकर, राणी विजय तोडकर, सुयोग बुरकुले, वसंतअप्पा मोगरकर, यश तोडकरआदी उपस्थित होते. यावेळी सुखदेव सुकळे यांच्या’ देशहितवादी’ पुस्तकाचे वितरण करण्यात येऊन त्यावर परिसंवाद झाला. अनेकांनी या ग्रंथाच्या निर्मितीबद्दल सुकळेसर यांचे अभिनंदन केले. सुकळेसर यांनी 30 जानेवारी2018 रोजी स्थापन झालेल्या विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या सामाजिक, साहित्यिक कार्याची माहिती देऊन’ देशहितवादी’ पुस्तकाचे वेगळेपण सांगितले. सत्कराविषयी आभार मानले. डॉ. किरण मोगरकर यांनी’ देशहितवादी’ ग्रंथाविषयी समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. किरण मोगरकर, वसंतअप्पा मोगरकर यांचा प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला. देऊळगाव राजा मित्र परिवारातर्फे सुखदेव सुकळेसर यांचा सन्मान झाल्याबद्दल प्राचार्य टी. ई. शेळके, डॉ. राजीव शिंदे, डॉ. बाबुराव उपाध्ये, प्राचार्य शंकरराव अनारसे, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्रा. शिवाजीराव बारगळ, डॉ. शिवाजी काळे आदिंनी विशेष कौतुक केले. प्रतिष्ठानचे खजिनदार सुयोग बुरकुले यांनी आभार मानले.
COMMENTS