Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशांतता निर्माण करणारे गुन्हेगार व चिथावणीखोरांवर कडक कारवाई करा 

संगमनेर प्रतिनिधी- विकासातून वैभवाकडे वाटचाल करणारे संगमनेर शहर हे सर्वधर्मसमभाव, सुसंस्कृतपणा आणि शांतताप्रिय आहे. मात्र मागील काही दिवसापासून

मनपा कर्मचारी पतसंस्थेत सहकार पॅनलचा डंका
कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा
एसटी बस आणि कारच्या धडकेचा चौघांचा मृत्यू

संगमनेर प्रतिनिधी- विकासातून वैभवाकडे वाटचाल करणारे संगमनेर शहर हे सर्वधर्मसमभाव, सुसंस्कृतपणा आणि शांतताप्रिय आहे. मात्र मागील काही दिवसापासून काही अपप्रवृत्ती शहरात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून अशा अशांतता निर्माण करणा-या गुन्हेगार व चिथावणी खोरांवर तातडीने कडक कारवाई करावी अशी आग्रही मागणी करत संगमनेरच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी सर्वपक्षीय व सर्व धर्मीय नागरिक एकवटले आहेत.

आज प्रांतआधिकरी कार्यालय येथे प्रांताधिकारी शैलेश हिंगे व उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना तमाम संगमनेर करांच्या वतीने शांतता व सुव्यवस्थेसाठी चे निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे ,काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे , मा. नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड, उद्योजक मनीष मालपाणी , युवक काँग्रेसचे निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री , शिवसेनेचे अमर कतारी, संजय पुंड, शिवजयंती उत्सव समितीचे सागर बागे, भाजपा युवा मोर्चाचे दीपेश ताटकर,  व्यापारी असोसिएशनचे प्रकाश कलंत्री, गजेंद्र नाकील ,संतोष करवा, जावेद शेख,रियाज सय्यद, अशोक सातपुते ,समीर ओझा ,गजेंद्र अभंग, नरेंद्र ओझा, आजिज ओहरा , गणेश मादास, जसपाल डंक, ओंकार भंडारी, किशोर पवार, मोहसीन रशीद शेख, सौ अर्चना बालोडे, डॉ. श्रद्धा वाणी, संज्योत वैद्य , सौ निर्मला गुंजाळ, डॉ सौ दिपाली पानसरे , किशोर टोकसे यांच्यासह सर्वपक्षीय,सर्वधर्मीय कार्यकर्ते,पदाधिकारी तसेच विविध सामाजिक आणि सेवाभावी व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी , महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसापासून संगमनेर शहर व तालुक्यातील जनतेमध्ये अस्वस्थता व शांतता निर्माण करण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील व तालुक्यातील सर्वसाधारण नागरिक, व्यावसायिक व इतर वर्ग यांना वेठीस धरण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे.

संगमनेर हे संस्कृत गाव असून अशांतता निर्माण करणाऱ्या अशा अपप्रवृत्तींना जनतेने नेहमीच एकत्रितपणे विरोध केला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने निरपेक्ष रहावे व अशांतता पसरवणाऱ्या गुन्हेगारांना आणि चिथावणीखोरांना वेळीच पायबंध घालावा. तसेच त्यांच्यावर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी. शांतता सुव्यवस्था निर्माण करण्याच्या  प्रशासनास प्रयत्न आमचे कायम सहकार्य राहील याची ग्वाही आम्ही देतो. या निवेदनावर संगमनेर शहर व तालुक्यातील सुजान नागरिकांच्या सह्या असून निवेदन देण्याकडे सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, तसेच विविध सेवाभावी व सामाजिक,व्यापारी संघटनांचे  प्रतिनिधी उपस्थित होते.. सणसुदीच्या व उत्सवाच्या काळामध्ये काही मोजक्या लोकांकडून अशांतता निर्माण करून सामाजिक तेढ निर्माण केला जात आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून संगमनेर मधील सुज्ञ, सुजाण व संस्कृत नागरीक अशा षड्यंत्राला बळी पडणार नाही .अशी भावना सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत असून कोणीही अफवा पसरू नये तसेच चुकीच्या लोकांना पाठीशी घालू नये अशी मागणी ही या शिष्टमंडळाने केली आहे..

अशांतता निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना तातडीने कडक कारवाई करा- सौ दुर्गाताई तांब – शांतताप्रिय संगमनेरची शांतता भंग करण्यासाठी काही अज्ञात शक्ती षडयंत्र करत आहेत. हे अगदी मोजके लोक असून त्यांच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका तसेच अशा विध्वंसक प्रवृत्तीच्या लोकांना ओळखून तातडीने पोलीस यंत्रणांना माहिती द्या असे आवाहन सौ दुर्गाताई तांबे यांनी केले असून अशांतता निर्माण करू पाहणारे गुन्हेगार व त्यांच्या पाठीशी असणारे चिथावणीखोर यांच्यावरही प्रशासनाने तातडीने कडक कारवाई करावी अशी  शहरातील सर्व नागरिकांनी केली आहे

COMMENTS