Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मला तडीपार करण्याचा फडणवीसांचा डाव

मनोज जरांगे यांचा पुन्हा गंभीर आरोप

बीड ः मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र करणारे मनोज जरांगे गेल्या काही दिवसांपासून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका करतांना दिसून येत आहे

बेळगावात फडणवीसांना दाखवले काळे झेंडे
 भाजपाचा निवडुण येण्याचा रेट इतरांपेक्षा जास्त आहे – उपमुख्यमंत्री
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

बीड ः मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र करणारे मनोज जरांगे गेल्या काही दिवसांपासून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका करतांना दिसून येत आहे. शुक्रवारी देखील मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र डागले. बीड जिल्ह्यात माझ्याविरोधात दहा-पंधरा गुन्हे दाखल करायचे आणि मला तडीपार करण्याचा डाव गृहमंत्र्यांनी आखल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे.
बीडच्या चराटा येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी त्यांनी भेट दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी हा आरोप केला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, परळी सारख्या ठिकाणी एक लाखाची सभा होत असेल तर यातून गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यायला हवा. मराठा द्वेष करून चालणार नाही. पण त्यांच्या लक्षात येत नाही, त्याला मी काही करू शकत नाही. एक लाखाच्या सभेनंतर त्यांनी शहाणपणाची भूमिका घ्यायला हवी. आता तर 900 एकरवर सभा घेणार आहे. त्यात पुन्हा दिसेल. गृहमंत्र्यांनी माझ्याबद्दल एवढा द्वेष बाळगण्याचे कारण नाही. मला तर रात्री अशी माहिती मिळाली की, मला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याचा त्यांचा डाव आहे. गृहमंत्र्यांनी स्वप्न बघायचं जरा कमी करावं. माझ्या क्लिप व्हायरल करून, मला तडीपार करण्याचं स्वप्न त्यांनी बघू नये. आता मराठा समाज तर विरोधात गेला आहेच, पण इतर समाजही विरोधात चालला आहे. मी 24 मार्चला यावर भूमिका जाहीर करणार आहे. परळीच्या सभेला जमलेल्या गर्दीवरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी हा संकेत समजून घ्यावा. त्यांचा डाव मराठा समाज बांधव यशस्वी होऊ देणार नाही, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

COMMENTS