Homeताज्या बातम्यादेश

’पतंजली’चा बिनशर्त माफीनामा

रामदेव बाबांना धक्का ; सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

नवी दिल्ली ः दिशाभूल करणार्‍या जाहिरातींमुळे पतंजली आयुर्वेदच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणात रामदेव बाबा यांना फटकार

आरोपांच्या मालिकेद्वारे भाजपची सत्तेसाठी धडपड ; रोहित पवार यांची टीका
अहमदनगर जिल्ह्यातील 3 लाख हेक्टरवरील पिके अडचणीत
सोनेरी दिव्यानं उजळलं सोलापूरच ‘प्रभाकर महाराज मंदिर’ 

नवी दिल्ली ः दिशाभूल करणार्‍या जाहिरातींमुळे पतंजली आयुर्वेदच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणात रामदेव बाबा यांना फटकारले असून त्यांना स्वत: कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिले आहेत. त्यानंतर आता पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दिशाभूल करणार्‍या जाहिरातींबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे.
यासंदर्भातील सविस्तर वृत्त असे की, इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजली आयुर्वेद विरोधात एक रिट याचिका दाखल केली होती. पतंजली आयुर्वेदकडून ड्रग्ज अँण्ड ऑदर मॅजिक रेमेडिज अ‍ॅक्ट, 1954 व ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे थेट उल्लंघन केले जात असल्याचा दावा या याचिकेद्वारे करण्यात आला होता. अ‍ॅलोपॅथीकडून होणारा अपप्रचार : स्वत:ला व देशाला फार्मा व मेडिकल क्षेत्रातून होणार्‍या अपप्रचारापासून वाचवा, अशा मथळ्याखाली पतंजली आयुर्वेदने 10 जुलै 2022 रोजी एका वृत्तपत्रात अर्ध्या पानावर औषधांबाबत जाहिरात दिली होती. तसेच कोरोना साथीच्या वेळी बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांचा देखील उल्लेख रिट याचिकेत करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. हिमा कोहली आणि न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने यांनी याचिकेतील आरोपांची दखल घेत 19 मार्च रोजी पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने पंतजली समुहाला दिशाभूल करणार्‍या जाहिरातींबद्दल 21 नोव्हेंबर 2023 रोजी खडसावले होते. त्यानंतर पुन्हा एकदा 4 डिसेंबर 2023 रोजी पंतजली आयुर्वेदने प्रकाशित केलेल्या जाहिरातीवरून सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. पतंजली आयुर्वेदाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून दिशाभूल करणार्‍या जाहिरातीप्रकरणी बिनशर्त माफी मागितली आहे. पतंजली आयुर्वेद आणि त्याचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी दिशाभूल करणार्‍या आणि फसव्या औषधांच्या जाहिराती दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात माफीनामा सादर केला आहे. तसेच या माफीनाम्यात पुन्हा अशा जाहिरात प्रसारित न करण्याचे आश्‍वासनही देण्यात आले आहे. कंपनीच्या मीडिया विभागाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती नव्हती. पतंजली उत्पादनांचा वापर करून नागरिकांना निरोगी जीवन जगण्यास प्रोत्साहित करणे हा यामागचा उद्देश आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.

भविष्यात चुकीच्या जाहीराती न करण्याची हमी – पतंजलीकडून सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात नमूद करण्यात आले, पतंजलीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरातीमध्ये मोघम विधाने करत असताना त्यातून आक्षेपार्ह संदेश गेला, याबद्दल आम्हाला खंत वाटते. पतंजलीच्या माध्यम विभागाकडून 4 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात देण्यात आली. नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची त्यांना कल्पना नव्हती. भविष्यात अशा जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत, याची खात्री आम्ही देतो.

COMMENTS