नवी दिल्ली ः केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारंसहिता जाहीर केल्यानंतरही केंद्र सरकाच्या आयटी टीमकडून विकसित भारतचे संदेश पाठवणे सुरूच होते, अखेर याची
नवी दिल्ली ः केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारंसहिता जाहीर केल्यानंतरही केंद्र सरकाच्या आयटी टीमकडून विकसित भारतचे संदेश पाठवणे सुरूच होते, अखेर याची तक्रार आयोगाकडे करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत केंद्र विकसित भारतचे संदेश देणे थांबवा अशा सूचना केंद्राला दिल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊनही आचारसंहिता लागू असतानाही सरकारच्या योजनांची माहिती देणारे संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले जात असल्याची तक्रार आयोगाकडे आली होती. तथापि, मंत्रालयाने आयोगाला दिलेल्या उत्तरात असे म्हटले होते की हे संदेश आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पाठविण्यात आले होते, परंतु सिस्टम आणि नेटवर्क समस्यांमुळे ते उशिरा पोहोचले. यापूर्वी आयोगाने गुजरात, पंजाब, ओडिशा आणि आसाम या चार राज्यांमध्ये नॉन-कॅडर अधिकार्यांच्या बदलीचे आदेश जारी केले होते. यामध्ये 8 जिल्हाधिकारी आणि 8 एसपींचा समावेश आहे. आसाममध्ये सीएम हिमंता बिस्वा सरमा यांचे भाऊ सोनितपूरचे एसपी सुशांत बिस्वा सरमा आणि पंजाबमध्ये खादूर साहिबमधील काँग्रेस खासदार जसबीर सिंग गिल यांचे भाऊ भटिंडा हर्ननबीर सिंग गिल यांना हटवण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी 7 टप्प्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू झाली आहे.
COMMENTS