Homeताज्या बातम्यादेश

लोकसभा निवडणुकीची आज घोषणा

मुख्य निवडणूक आयुक्त निवडणूक कार्यक्रम करणार जाहीर

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीचा बिगुल नेमका कधी वाजेल, याची उत्सुकता राजकीय पक्षांसह देशभरातील सर्वंच मतदारांना होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून

6 लग्न करून फसवणूक
‘उर्दू घर’च्या माध्यमातून नव्या सांस्कृतिक पर्वाचा प्रारंभ : अशोक चव्हाण
‘इलेक्ट्रीक पब्लिक ट्रान्सपोर्ट’ देशाला परवडणारे : नितीन गडकरी

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीचा बिगुल नेमका कधी वाजेल, याची उत्सुकता राजकीय पक्षांसह देशभरातील सर्वंच मतदारांना होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून, आज शनिवारी निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. या निवडणूक कार्यक्रमामुळे निवडणूका नेमक्या किती टप्प्यात होणार आहे, यासोबतच मतदान कधी होणार आहे, या सर्व बाबींचा उलगडा आज स्पष्ट होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसह ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुका सात ते आठ टप्प्यांत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नवनियुक्त निवडणूक आयुक्तांच्या औपचारिक स्वागतानंतर पूर्ण आयोगाची बैठक झाली. ही बैठक जवळपास 45 मिनिटे चालली. निवडणूक आयोगाच्या आजच्या बैठकीत निवडणुका निष्पक्ष, शांततेने व्हाव्यात यासाठी संवेदनशील क्षेत्रांत आणि राज्यांमध्ये किती मनुष्यबळ तैनात करावे लागेल, याबाबतचा आढावा घेण्यात आल्याचे सूत्रांकडून कळते. याव्यतिरिक्त किती टप्प्यांत निवडणूक कार्यक्रम घ्यायचा आहे? कोणत्या राज्यांत आधी आणि कोणत्या राज्यांत नंतर निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, या आणि अशा अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयुक्त गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे निवडणूक आयोग केवळ एकसदस्यीय झाला होता. दोन पदे रिक्त असल्यामुळे निवडणुकीचा कार्यभार हाकणे अवघड होणार होते. अखेर गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नेश कुमार आणि सुखबीर संधू हे नवीन निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आयोगाने लोकसभा निवडणुकीच्यासंदर्भात पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून, त्यानुसार शनिवारी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. दोन नव्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक केल्यानंतर शनिवारी दुपारी 3 वाजता तिन्ही निवडणूक आयुक्त संयुक्त पत्रकार परिषद घेणार असून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केली जाणार आहे. याच पत्रकार परिषदेतून हा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात येणार आहेत. एका दिवसापूर्वी दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू हे नवीन निवडणूक आयुक्त आहेत ज्यांनी शुक्रवार, 15 मार्च रोजी पदभार स्वीकारला. आयोगाच्या तिन्ही अधिकार्‍यांनी शुक्रवारीच निवडणूक कार्यक्रमासंदर्भात बैठक आयोजित केली होती. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम शनिवारी जाहीर होणार असल्याची घोषणा केली आहे.

गेल्या वेळी सात टप्प्यांत निवडणुका – यंदा 2024 च्या लोकसभा किती टप्प्यात होतात आणि कधी मतदान होणार होईल याची उत्सुकता असतांनाच, 2019 मध्ये लोकसभा निवडणुका सात टप्प्यात पार पडल्या. गेल्या वेळी निवडणूक आयोगाने 10 मार्च रोजी तारखा जाहीर केल्या होत्या. पहिल्या टप्प्याचे मतदान 11 एप्रिलला तर शेवटच्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान झाले. 23 मे रोजी निकाल लागला. त्या निवडणुकीच्या वेळी देशात 91 कोटींहून अधिक मतदार होते, त्यापैकी 67 टक्के मतदारांनी मतदान केले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 2014 च्या तुलनेत मोठा विजय मिळवला होता. 2014 मध्ये भाजपने 282 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये 303 जागा जिंकल्या होत्या. तर एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या.

COMMENTS