Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई शहरात 5 टक्के पाणीकपात

मुंबई ः बृहन्मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारपासून येत्या 24 एप्रिलपर्यंत शहरात पाच टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. महापालिकेच्या भांडुप जलशुद्धीकरण

छत्तीसगडमध्ये अपघातात 6 जणांचा मृत्यू
बिबी धरणाचे काम सुरू; शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार?

मुंबई ः बृहन्मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारपासून येत्या 24 एप्रिलपर्यंत शहरात पाच टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. महापालिकेच्या भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात करण्यात येणार्‍या तपासणी व स्वच्छतेच्या कामांमुळे ही उपाययोजना करण्यात आली आहे. भांडुप येथील जलशुद्धीकरण प्रकल्प हा आशियाखंडातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून पालिकेच्या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. भांडुप संकुल येथे एक हजार 910 दशलक्ष लिटर आणि 900 दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरण करणारी दोन युनिट आहे. पालिकेतर्फे मान्सूनपूर्व साफसफाई व तपासणी प्रक्रिया राबविली जाते.

COMMENTS