Homeताज्या बातम्यादेश

राजधानीत पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीतील शहादरा परिसरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या एका 4 मजली इमारतीला गुरुवारी (ता. 14) पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली

भाजप नेते प्रभात झा यांचे निधन
समूह शाळा योजनेला राज्यातून नकारची घंटा
आठ महिन्यात सायबरचे 1114 गुन्हे दाखल , पुणेकरांना 20 कोटींचा गंडा

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीतील शहादरा परिसरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या एका 4 मजली इमारतीला गुरुवारी (ता. 14) पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीचा भडका उडाला. आग लागल्याचे कळताच इमारतीतील रहिवासी जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडले. मात्र, या आगीत पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मनोज (वय 30), सुमन (वय 28) यांच्यासह 5 वर्षीय चिमुकला आणि 3 वर्षाची चिमुकली आगीत मृत्युमुखी पडले आहेत.  दिल्लीतील शहादरा परिसरातील शास्त्रीनगर भागात 4 मजली इमारत आहे. गुरुवारी (ता. 14) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगला अचानक आग लागली. बघता-बघता आगीने संपूर्ण इमारतीला विळखा घातला. आग लागल्याचे कळताच मोठी आरडाओरड सुरू झाली. इमारतीतील रहिवाशांनी जीवाच्या आकांताने बाहेर धाव घेतली. मात्र, एका नवविवाहित जोडप्यासह दोन चिमुकले आगीच्या भक्षस्थानी सापडले. श्‍वास घुसमटल्याने त्यांना इमारतीच्या बाहेर पडता आले नाही. परिणामी आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. या आगीत तीन पुरुष आणि चार महिला देखील जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

COMMENTS