Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दक्षिण मुंबईच्या जागेवर मनसेचा उमेदवार

मुंबई ः मुंबईमध्ये लोकसभेच्या सहा जागा असून, यापैकी दक्षिण मुंंबईच्या जागेवर खासदार झालेले अरविंद सावंत उद्धव ठाकरे गटासोबत आहेत. सावंत या जागेवर

तानाजी विरकर ठरला नागोबा केसरीचा मानकरी; दिल्लीच्या बंटी कुमारला दाखवले आस्मान; शौकिनांची तोबा गर्दी
सुलभ शौचालय महिलांसाठी मोफत करावे
दोन महिलांची नग्न धिंड काढल्याने देशभरात संताप

मुंबई ः मुंबईमध्ये लोकसभेच्या सहा जागा असून, यापैकी दक्षिण मुंंबईच्या जागेवर खासदार झालेले अरविंद सावंत उद्धव ठाकरे गटासोबत आहेत. सावंत या जागेवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून लढणार आहेत. मात्र त्यांचा पराभव करण्यासाठी महायुती सरसावली असून, याठिकाणी दक्षिण मुंबईची जागा मनसेला सोडण्याचा विचार महायुती करत असल्याचे दिसून येत आहे. यावर अजूनही शिक्कामोर्तब झाले नसले तरी, मनसेचा उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी गळ घालण्यात येत आहे.
शिवसेनेत फूट पाडून भाजपने उद्धव ठाकरे यांना पहिला धक्का दिला होता. मात्र, त्यानंतरही ठाकरे यांची शिवसेना पुन्हा जोमाने काम करत असल्याने भाजपने आणखी मनसेलाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुंबईतील लोकसभेच्या सहा जागा केवळ केंद्रातील सत्तेसाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका आणि महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सध्या मुंबईत भाजपचे तीन खासदार आहेत. तर, मूळ शिवसेनेचे तीन खासदार आहेत. त्यापैकी दोन खासदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत, म्हणजेच भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सोबत अरविंद सावंत हे एकमेव खासदार आहेत. सावंत हे सध्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. सावंत हे कामगार नेते असून तळागाळात त्यांचा संपर्क आहे. शिवाय, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येणारा भाग हा मराठीबहुल आहे. येथील मतदारांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा पगडा आहे. प्रत्येक संकटाच्या काळात इथल्या मतदारांनी शिवसेनेला साथ दिली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहा आमदारांपैकी तीन आमदार महायुतीचे आहेत आणि तीन महाविकास आघाडीचे आहेत. भाजपनं इथं राहुल नार्वेकर यांच्या रूपानं मराठी उमेदवार देण्याचा विचार सुरू केला आहे. मात्र, हा मतदारसंघ एकट्याच्या बळावर जिंकणं हे भाजपसाठी सोपं नाही. त्यामुळे तो मनसेसाठी सोडावा किंवा अप्रत्यक्ष मनसेची मदत घ्यावी असा भाजपचा प्रयत्न आहे. त्याबाबत पडद्यामागे बर्‍याच वाटाघाटी सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.

COMMENTS