Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लिंपणगावमध्ये लाथा बुक्क्याने मारहाण करत शस्त्राने वार

तीन जणांवर गुन्हा दाखल ; कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी ः तमाशा पाहून घरी परतताना एकावर लाथाबुक्याने व धारदार शस्त्राने वार करण्यात आलेले असून या प्रकरणी आणखी तीन जणांवर गुन्हा

जामखेड नगरपरिषद कर्मचारी संपावर
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
बनावट सोने प्रकरणातील 160 जणांना पकडण्याचे शेवगाव पोलिसांसमोर आव्हान

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी ः तमाशा पाहून घरी परतताना एकावर लाथाबुक्याने व धारदार शस्त्राने वार करण्यात आलेले असून या प्रकरणी आणखी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. ही घटना लिंपणगाव मुंडेकरवाडीच्या सरहद्दीवर घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लिंपणगाव तालुका श्रीगोंदा येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांचा यात्रा उत्सव दिनांक आठ मार्च पासून महाशिवरात्रीपासून तीन दिवस गावात सुरू होता. यानिमित्त यात्रा कमिटीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी यात्रा कमिटीने उत्सवानिमित्त लोकनाट्याचा आयोजित करण्यात आला होता. सदर लोकनाट्य तमाशा पार पडल्यानंतर काही एक कारण नसताना तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्याचे रूपांतर लाथा भुक्क्याने व धारदार शस्त्रापर्यंत जाऊन पोहोचले. याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादी किशोर आबासाहेब तांबे वय 23 राहणार मुंडेकरवाडी लिंपणगाव यांनी या घटनेची फिर्याद श्रीगोंदा पोलिसात दाखल केली आहे. या फिर्यादीमध्ये किशोर तांबे यांनी म्हटले आहे की, फिर्यादीवर त्याचा मित्र प्रीतम कुरुमकर हे तमाशा बघून घरी जात असताना काही एक कारण नसताना फिर्यादीच्या मित्राला लाथाबुक यांनी मारहाण केली. ही घटना 11 मार्च रोजी रात्री 1.30 च्या सुमारास घडली. व फिर्यादीने धारदार शस्त्राने जबर मारून जखमी केले आहे. यामध्ये आरोपी चेतन देवकर, महेश लष्करे, शुभम कुशेकर व दोन ते तीन अनोळखी इसमावर श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 324, 143, 147, 149 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घडल्या घटनेचा पुढील तपास श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आर के शिंदे हे करीत आहेत.

पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज –  ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार लिंपणगाव येथे वारंवार किरकोळ वादातून तरुणांमध्ये मारहाणीच्या घटना घडतात. याबाबत पोलीस यंत्रणेने गावची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. गावामध्ये अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत असताना तरुणांमध्ये किरकोळ वादातून धारदार शस्त्राने एकमेकांना मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे गावच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न मोठा गंभीर बनत चालला असून, श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये गेल्या वर्षभराच्या कालावधी अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. जामीन मिळाल्यानंतरही गुन्हेगारीचे प्रमाण कमी होताना दिसत नाहीत. यासाठी श्रीगोंद्याच्या पोलीस निरीक्षकांनी या प्रश्‍न गावच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

COMMENTS