Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपकडून देशात सत्तेचा गैरवापर ः खा. शरद पवार

पुणे ः देशात सध्या भाजपकडून सत्तेचा गैरवापर करत विरोध करणार्‍यांना तुरूंगात डांबण्याचा प्रकार सुरू आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तु

राजीनामा मागे घेण्याचे संकेत ?
द्राक्षांच्या बागेवरील प्लास्टिकसाठी 50 टक्के अनुदान द्यावे ः खा. शरद पवार
पवार साहेब कितने पैसे है,गिन गिन के हिसाब लेंगे (Video)

पुणे ः देशात सध्या भाजपकडून सत्तेचा गैरवापर करत विरोध करणार्‍यांना तुरूंगात डांबण्याचा प्रकार सुरू आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबले असून, आता ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यामागे लागले आहेत. केजरीवाल यांना क्राईम ब्रँचने आठवे समन्स धाडले आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अटक करण्याची भाजपने योजना आखली असून तसेच चित्र महाराष्ट्रात दिसत असल्याची टीका खासदार शरद पवार यांनी गुरूवारी भाजपवर केली. शरद पवार गटाने गुरूवारी लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला हजेरी लावून स्वतः शरद पवार यांनी लोणावळ्यासह मावळमधील त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्रात अनिल देशमुखांना सहा महिने तुरुंगात डांबून ठेवले होते. देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले. त्यानंतर त्यांना सहा महिने तुरुंगात डांबण्यात आले. शेवटी न्यायालयाने त्यांना मुक्त केले. त्यावेळी सांगण्यात आले की, देशमुख यांनी एक कोटी रुपयांची देणगी स्वीकारली होती. एका महाविद्यालयाची इमारत बांधण्यासाठी देशमुखांनी धनादेशाच्या माध्यमातून देणगी घेतली होती. अनिल देशमुखांप्रमाणे भाजपावाल्यांनी सामनाचे संपादक आणि ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनाही चार महिने तुरुंगात डांबे होते. कारण राऊत हे सामनातून भाजपावर टीका करतात. या देशात बोलण्याचं आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही. आपल्या देशात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींपासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत अनेक पंतप्रधान आणि मोठे नेते झाले. परंतु, एखाद्या लेखकाने किंवा संपादकाने टीका केली म्हणून त्याला कोणी तुरुंगात टाकले नाही, असा दावा देखील शरद पवार यांनी केला आहे.

पवारांनी आमदार शेळकेंना सुनावले  – तुझ्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेव. यापुढे असे केलेस तर मला शरद पवार म्हणतात… हे विसरू नको, मी त्या वाटेने जात नाही, मात्र गेलो तर कोणाला सोडत नाही, अशा शब्दात खासदार शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांच्या सभेला पदाधिकारी आणि कार्यकर्ते येत असताना त्यांना सभेला जाऊ नका, अशी धमकी देण्यात आल्याची तक्रार शरद पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांनी करण्यात आली होती. यावरून शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना तू आमदार कोणामुळे झाला हे लक्षात ठेव, असे सुनावले आहे.

आमदारांना धमक्या देणे अयोग्य ः फडणवीस – खासदार शरद पवार हे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत. 55 वर्षे त्यांची राजकीय कारकीर्द आहे. त्यांच्यासारख्या इतक्या ज्येष्ठ नेत्याने सुनील शेळके या आमदारांना धमकी दिली असेल तर ते योग्य नाही. मी शरद पवारांना सल्ला देण्याइतका मोठा नाही. पण त्यांनी याचा पुनर्विचार केला पाहिजे. ते आज कुठल्या स्तराला आहेत. अशा प्रकारे ते आमदारांना धमक्या देऊ लागले तर त्यांचा स्तर खाली येईल. मला वाटत नाही की कुणी आमदार शरद पवारांना धमकी देईल. मी काही त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही, तुम्ही जे सांगत आहात त्यावर मी इतकीच प्रतिक्रिया देतो आहे की असं त्यांनी बोलणं योग्य नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात म्हटलं आहे.

COMMENTS