Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत सीएनजीच्या अडीच रूपयांची दरात कपात

मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महानगर गॅस लिमिटेडनं मुंबईतील सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2.50 रुपयांची कपात केली आहे. महानगर गॅस लिमिटेडने प्र

अभिनेत्री आर्चीने घेतलं ज्योतिबाचं दर्शन
पत्नीने नांदायला नकार दिल्याने पतीने पत्नीवर व स्वतःवर केला चाकूने वार
मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान  जिल्हाधिकारी यादव

मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महानगर गॅस लिमिटेडनं मुंबईतील सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2.50 रुपयांची कपात केली आहे. महानगर गॅस लिमिटेडने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. महागनगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दर कपातीच्या घेतलेल्या निर्णयाचे मुंबईकरांकडून स्वागत करण्यात आले आहे.
मुंबई महानगर गॅसकडून नैसर्गिक वायूच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने गॅसदरात कपात करण्यात येत आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर चालणारी वाहने आहेत. दर कपातीमुळे या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2.50 रुपयांची कपात करण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांना आता एक किलो सीएनजीसाठी केवळ 73.40 रुपये मोजावे लागतील. महत्त्वाचे म्हणजे, मुंबई महानगर गॅसच्या सीएनजीचे दर पेट्रोलच्या तुलनेत 53 टक्के आणि डिझेलच्या तुलनेत 22 टक्क्यांनी कमी आहेत. सीएनजीच्या दरातील कपातीमुळे वाहतूक क्षेत्रातील नैसर्गिक वायूचा वापर वाढण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंबईनंतर देशातील इतर भागातही सीएनजीच्या दरात कपात केली जाऊ शकते.

COMMENTS